पुणे : जिल्ह्यातील चालू वर्षी मुदत संपणाऱ्या २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया पार पडली असून २५ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

चालू वर्षी जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. अशा ग्रामपंचायतींची मुदत संपण्याआधी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी १३ तालुक्यांतील २३३ ग्रामपंचायतींची गुगल मॅपच्या सहाय्याने नकाशे अंतिम करण्यात आले आहेत. तत्पूर्वी नकाशे अंतिम करण्यासाठी तहसीलदार पातळीवर गट विकास अधिकारी, मंडल अधिकारी यांनी तपासणी करून तलाठी, ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीत प्रभाग पाडून सीमा निश्चित करण्यात आल्या. त्यानंतर प्रारूप यादी जाहीर करून नागरिकांकडून सूचना, हरकती मागविण्यात आल्या.

हेही वाचा – पिंपरी : गृहनिर्माण सोसायटीत आयपील क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारे जेरबंद

प्राप्त हरकतींवर सुनावण्या घेऊन दुरुस्त्या करत नव्याने प्रभाग रचना यादीबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला. त्याला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिल्याने येत्या २५ एप्रिल रोजी मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पिंपरी : कापड दुकानदाराला खंडणी मागत दुकानासह जाळून टाकण्याची धमकी देणारा गजाअड

जिल्ह्यात चालू वर्षी मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेगाव तालुक्यातील ३०, बारामती ३२, भोर २७, दौंड ११, हवेली चार, इंदापूर सहा, जुन्नर २६, खेड २५, मावळ २०, मुळशी २३, पुरंदर १५, शिरूर आठ, वेल्हे सहा अशा एकूण २३३ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.