लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : वाहनावर कारवाई करू नये म्हणून दुचाकी चालकाने महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खराळवाडी येथे घडली. तुषार सुंदरबापू क्षीरसागर (वय ३०, रा. देहू) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुषार मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता दुचाकीवरून पुणे मुंबई महामार्गावरून जात होता. खराळवाडी येथून साई चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पिंपरी वाहतूक पोलिसांनी त्याची दुचाकी अडवली. पोलिसांनी त्याच्या दुचाकीवर कारवाई करू नये, यासाठी त्याने पोलीस महिलेला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सहायक पोलीस निरीक्षक लोहार तपास करीत आहेत.