दीपा पाटील

साहित्य

* १ किलो बोनलेस चिकन, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा आले-लसूण वाटलेले, पाव चमचा जिरे, ४ अख्ख्या वेलच्या, १ इंच दालचिनी, २ चमचे कोथिंबीर, २ तमालपत्र, १ चमचा तिखट, १ चमचा हळद, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, २ चमचे साजूक तूप, मीठ

मॅरिनेशन – १ कप घट्ट दही, ३ चमचे कांद्याची पेस्ट, २ चमचे काजू, २ चमचे मगज बी, ४ लसणीच्या पाकळ्या.

कृती

आधी काजू, मगज बी, लसूण आणि जायफळ एकत्र वाटून घ्यावे. त्यात कांद्याची पेस्ट, लिंबूरस, दही घालून एकत्र मिसळावे. आता यामध्ये चिकनचे तुकडे घालून ३ तासांसाठी ते मुरायला ठेवून द्यावे. एका भांडय़ात तूप गरम करून त्यात दालचिनी, तमालपत्र, जिरे, अख्खी वेलची, दालचिनी घालून परतावे आणि आले-लसूण घालून परतावे. शेवटी त्यात चिकन घालून १५ मिनिटे परतावे. यानंतर सर्व मसाले म्हणजे तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला घालून पुन्हा परतावे. शिजल्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.