18 October 2019

News Flash

आरोग्यदायी आहार : पावभाजी खाकरा

व्हाच्या पिठात सर्व साहित्य टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर पीठ मळावे.

– डॉ. सारिका सातव

साहित्य

* २ वाटय़ा गव्हाचे पीठ, २ चमचे मुगाचे पीठ, दोन मोठे चमचे पावभाजी मसाला, चवीपुरते मीठ आणि २ चमचे तेल.

कृती

* गव्हाच्या पिठात सर्व साहित्य टाकून, आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसर पीठ मळावे.

* तयार पीठ १५-२० मिनिटे ठेवून लिंबाच्या आकाराचे छोटे गोळे तयार करावेत.

* प्रत्येक गोळा चपातीप्रमाणे पातळसर लाटावा.

* मंद आचेवर कुरकुरीत, कडक भाजून घ्यावा. भाजताना कापडाने दाबत राहावे.

* खाकरा मेकर यंत्राचाही वापर करता येईल.

वैशिष्टय़े

* तेलाचा वापर अतिशय कमी प्रमाणात होत असल्यामुळे यात उष्मांक कमी असतात.

* चव उत्तम असते.

* प्रवासाला नेण्यासाठी हा पदार्थ उत्तम ठरतो. बरेच दिवस टिकतो.

* लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मोठय़ांच्या नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ

* तंतुमय पदार्थ आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.

* मोड आलेली कडधान्ये किंवा फुटाण्याच्या चटणीबरोबर दिल्यास वजन कमी करणाऱ्यांसाठी, मधुमेहींसाठी, रक्तदाबाच्या रुग्णांसाठी उत्तम.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on April 23, 2019 2:56 am

Web Title: pav bhaji khakhra recipe for loksatta readers