शुभा प्रभू साटम
साहित्य
* ओले पावटे * तांदूळ * ओला लसूण * हिरवी मिरची * आले * कोथिंबीर ल्ल कांदा * तूप * अख्खा गरम मसाला * गोडा मसाला * गूळ, * हळद * मीठ.
कृती
ओले पावटे हळद मीठ घालून किंचित उकडून घ्यावेत. १ वाटी तांदूळ धुऊन, निथळवून घ्यावा. ओला लसूण, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर याचे वाटण करून घ्यावे. कांदा चिरून घ्यावा.
तूप गरम करून त्यात आख्खे मसाले घालून, परतून मग त्यात कांदा घालावा. ते लालसर झाल्यावर त्यावर हिरवे वाटण घालून परतावे. तांदूळ आणि पावटे घालून पुन्हा परतून घ्यावे. गोडा मसाला, गूळ, मीठ घालून दोन वाटय़ा पाणी घालावे. बाजूने थोडे तूप सोडावे. कुकरमध्ये शिट्टी काढावी. पावटाभात तयार आहे.