नीलेश लिमये

साहित्य

* ४ अंडी, १ कांदा, ६-७ लसणीच्या पाकळ्या, २ ब्लांच्ड टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे काश्मिरी मिरची पूड, ४ चमचे ऑलिव्ह तेल, मीठ-मिरपूड, १ चमचा व्हिनेगार

कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सगळ्यात आधी ब्लांच्ड टोमॅटो बारीक चिरून घ्या. शेगडीवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्यात मीठ आणि व्हिनेगर घाला. पाणी उकळल्यावर त्यामध्ये एक एक करून अंडी फोडा. पाण्यात साधारण ३ मिनिटे अंडी उकळू द्या. यालाच पोच्ड एग म्हणतात. उकळलेले अंडे एका प्लेटमध्ये काढून घ्या. एका भांडय़ात तेल गरम करा. त्यात कांदा, लसूण, मिरच्या आणि टोमॅटो परतून घ्या. त्या मध्ये काश्मिरी मिरची पूड आणि उकळलेली अंडी घाला. ही अंडी न फोडता साधारण ५ -६ मिनिटे हे मिश्रण शिजवा. तुमचा हेल्दी आणि पौष्टिक शकशुका तयार