शुभा प्रभू-साटम

साहित्य

तिसऱ्या वा शिंपल्या साधारण ५० नग, कांदा २ मोठे कांदे चिरून, आले, लसूण, बारीक चिरून १ मोठा चमचा, ओलं खोबरं अर्धी वाटी, मिरी ५-७ दाणे, हळद, लाल तिखट, कोकम.

कृती

तिसऱ्या फ्रिझरमध्ये दोन तास ठेवून सुटय़ा करून घ्याव्यात आणि त्यांना हळद, लाल तिखट लावा. मीठ लावू नये. कारण तिसऱ्यांना अंगचे मीठ असल्याने खारट होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ शेवटी घाला. तेल तापवून त्यात थोडं हिंग घालून कांदा मऊ, गुलाबी करून घ्या. तोपर्यंत ओलं खोबरं, मिरी, खरबरीत वाटून घ्या. मऊ झालेल्या कांद्यावर चिरलेले आले-लसूण घाला. परतून त्यावर तिसऱ्या घाला. व्यवस्थित ढवळून खोबरं वाटप लावा. कोकम घालून शेवटी मीठ घाला आणि १० मिनिटे झाकण ठेवून शिजवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप – ही एक सुकी मांसाहारी भाजी आहे. यात विळीवर शिंपल्या वा तिसऱ्या उघडून त्यातली एक शिंपली घेतात. पण सर्वाना ते जमेल असे नाही. त्यामुळे तिसऱ्या आणल्या की त्या सर्व माती किंवा रेती जाईपर्यंत स्वच्छ धुऊन चक्क फ्रिझरमध्ये दोन तास ठेवाव्यात म्हणजे त्यांची तोंडे उघडतात. नंतर एक एक शिंपली तोडून घ्यावी.

सोलकढी भात आणि एकशिपी फर्मास जमते.