Oats Paneer Tikki: आलू टिक्की, पनीर टिक्की आतापर्यंत तुम्ही अनेकवेळा खाल्ली असेल. पण आज आम्ही तुम्हाला ओट्स पनीर टिक्की कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही टिक्की बनवायला एकदम सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया ओट्स पनीर टिक्कीची सोपी रेसिपी ओट्स पनीर टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य: १ कप भिजवलेले ओट्स १ कप पनीर ३-४ उकडलेले बटाटे १ वाटी उकडलेले वाटाणे (मटर) १/२ वाटी शिमला मिरची १/२ वाटी गाजर २ चमचे लाल तिखट चवीनुसार मीठ ओट्स पनीर टिक्की बनवण्याची कृती: हेही वाचा: सणासुदीला घरीच बनवा ‘दुधाचे पेढे’; नोट करा साहित्य अन् कृती सर्वप्रथम ओट्स भिजवून त्यातील पाणी काढून ते एका भांड्यात काढून घ्या. आता त्यात साल काढलेले उकडलेले बटाटे टाका. त्यानंतर त्यात शिमला मिरची, गाजर, वाटाणे, पनीर हे सर्व साहित्य मिक्स करा. आता त्यात लाल तिखट आणि मीठ टाकून सर्व मिश्रण कुस्करुन घ्या. तयार मिश्रणाची गोल टिक्की तयार करुन गरम तेलात तळून घ्या. तयार गरमा गरम ओट्स पनीर टिक्की सॉसबरोबर सर्व्ह करा.