अनेकदा आपण प्रवास करताना किंवा नातेवाईकांकडे जाताना, घरातील लहानांसाठी खाऊ म्हणून चिक्की घेऊन जातो. खरंतर सध्या या चिक्कीची जागा गोळ्या-चॉकलेटांनी घेतली आहे. मात्र अजूनही आपल्या आजीकडे असणाऱ्या तिच्या खाऊच्या डब्यात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांमध्ये चिक्की ही हमखास पाहायला मिळते. या चिक्कीचे बघायला गेलो तर शेंगदाणा, राजगिरा असे कितीतरी वेगवेगळे आणि पौष्टिक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध असतात. आता बऱ्याचदा हा पदार्थ खाण्यासाठी थोडा कडक असतो. त्यामुळे ज्यांचे दात चांगले नसतील, अशा लहानांना किंवा मोठ्यांना आवडत असूनही चिक्कीचा आस्वाद घेता येत नाही.

मात्र इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sagarskitchenofficial या अकाउंटने नुकत्याच माव्याच्या/खव्याच्या चिक्कीची रेसिपी शेअर केली आहे. या चिक्कीची २ वैशिष्ट्ये आहेत. १. ही चिक्की इतर चिक्कीप्रमाणे कडक नसल्याने ती सर्वांना खाता येऊ शकते; आणि २. याच्या नावात जरी मावा/खवा असला तरीही यामध्ये प्रत्यक्षात मावा/खव्याचा वापर केलेला नाही. या भन्नाट आणि अतिशय सोप्या अशा चिक्कीची रेसिपी काय आहे ते पाहा.

हेही वाचा : Recipe : गाजर आणि ‘हा’ पदार्थ वापरून ख्रिसमस, न्यू इयर पार्टीसाठी पौष्टिक मफिन्स बनवा; पाहा रेसिपी….

झटपट तयार होणारी चिक्कीची रेसिपी पाहा

साहित्य

शेंगदाणे
गूळ
तूप

कृती

  • सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये दीड कप शेंगदाणे घालून व्यवस्थित भाजून घ्यावे.
  • शेंगदाणे गार झाल्यांनतर, त्याची साले सोलून घ्या आणि शेंगदाण्याची पूड बनवून बाजूला ठेवा.
  • पुन्हा कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यावे.
  • तूप तापल्यानंतर अर्धा कप गूळ घालून तो विरघळू द्यावा. गूळ जास्तवेळ शिजवत ठेवू नका अन्यथा चिक्की कडक होईल.
  • आता यामध्ये तयार केलेली शेंगदाण्याची पूड घालून सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • शेंगदाणे, तूप आणि गुळाचा पाक हे सर्व पदार्थ एकजीव झाल्यानंतर कढईखालील गॅस बंद करावा.
  • आता हे मिश्रण एक तूप लावलेल्या ताटलीमध्ये किंवा ट्रेमध्ये घालून भांड्याच्या मदतीने समान पसरून घ्यावे.
  • आता चिक्कीचे हे मिश्रण गार होण्यास ठेवून द्या. मिश्रण गार झाल्यानंतर सुरीच्या मदतीने चौकोनी आकारात तुकडे कापून घ्यावे.
  • तयार आहे तुमची पौष्टिक आणि तोंडात विरघळणारी चविष्ट चिक्की!
View this post on Instagram

A post shared by Sagar Kumar (@sagarskitchenofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @sagarskitchenofficial या अकाउंटवरून शेअर झालेल्या, या रेसिपी व्हिडीओला आतापर्यंत ७ लाख ८५ हजार इतके व्ह्यूज मिळाले आहेत.