Sankashti Chaturthi Special Thalipeeth: गणेशभक्तांसाठी संकष्टी चतुर्थी हा दिवस खूप खास असतो. हिंदू दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असते. संकष्टीच्या दिवशी बरेचसे भक्त हे उपवास करत असतात. तसचे या निमित्ताने घरी खास पदार्थ बनवले जातात. यामध्ये ज्वारीच्या थालीपीठाचाही समावेश असतो. काहीजण उपवासाच्या दिवशी नाश्ता किंवा जेवणामध्ये हे थालीपीठ खात असतात. हा सोपा आणि चविष्ट पदार्थ कसा बनवायचा हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य :

  • २ वाट्या ज्वारीचे पीठ,
  • २ वाट्या पाणी,
  • १ मोठा कांदा (उभा पातळ चिरून)
  • १/२ चमचा जिरे
  • १/४ चमचा हिंग
  • १/४ चमचा हळद
  • १ चमचा मिरची पेस्ट
  • १/४ वाटी चिरलेली कोथिंबीर
  • तेल
  • चवीपुरते मीठ

कृती :

  • एका भांड्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, जिरे, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे.
  • पाण्याची चव पाहावी. थोडी खारट असली पाहिजे म्हणजे पीठ घातल्यावर मीठ बरोबर लागेल.
  • पाणी उकळले की, ज्वारीचे त्यात पीठ घालून आच बंद करावी. नीट मिक्स करून लगेच झाकण ठेवावे.
  • १० मिनिटांनी ते मिश्रण मळून घ्यावे. मळताना मिरची पेस्ट, कांदा आणि कोथिंबीर घालावी.
  • पीठ मळत असताना गरज लागल्यास पाण्याचा हात लावावा. मोठे गोळे करावेत.
  • दोन प्लास्टिक पेपरला आतून तेल लावून थालीपीठ लाटून घ्यावे. तेल सोडण्यासाठी २-३ भोके पाडावीत.
  • तवा गरम करून तेल घालावे. थालीपीठ टाकून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी.
  • झाकण काढून आच थोडी वाढवावी. एक बाजू थोडी गोल्डन ब्राऊन होऊ द्यावी.
  • वरच्या बाजूवर आधीच तेल लावावे आणि कालथ्याने बाजू पालटावी. दुसरी बाजू खरपूस होऊ द्यावी.
  • दह्यबरोबर किंवा लोण्याबरोबर थालीपीठ सव्‍‌र्ह करावे.

आणखी वाचा – Fruit Modak Recipe : मोदक खायला आवडतात? असे बनवा स्वादिष्ट अन् हेल्दी फळांचे मोदक

11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
2nd April Tuesday Marathi Panchang Rashi Bhavishya
२ एप्रिल पंचांग: शेअर बाजारात फायदा ते जोडीदाराचं आरोग्य, आजच्या अष्टमीला तुमच्या राशीत काय लिहिलंय?
Holi 2024 Follow these skincare and haircare doctor tips to preserve radiance and health during celebrations
रंगपंचमीच्या रंगांपासून त्वचा अन् केसांची काळजी कशी घ्याल? डॉक्टरांनी सुचवले ‘हे उत्तम उपाय

(ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातून घेतलेली आहे.)