Shravan recipe 2024: सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात अनेक व्यक्ती उपवास करतात. या काळात महादेवाची मनोभावे सेवा केली जाते. त्यासाठी कुटुंबातील सर्व व्यक्ती उपवास करतात. उपवासाला फळे आणि साबुदाण्याचे विविध पदार्थ खाल्ले जातात. याच उपवासाला आता साबुदाणा बासुंदी करुन पाहा. चला याची रेसिपी पाहुयात.

साबुदाणा बासुंदी साहित्य

दूध- १ लीटर (फुल क्रीम)
साबुदाणा- १/४ कप
साखर- १५० ग्राम
ड्रायफ्रूट्स- १/४ कप (काजू, बदाम, पिस्ता)
इलायची- दीड टेबल स्पून
केसर- ४-५ काड्या

साबुदाणा बासुंदी रेसिपी –

१. खीर बनवण्याच्या अर्धा तास आधी साबुदाणा स्वच्छ धुवून भिजत ठेवा. त्यांनंतर एका खोलगट भांड्यात दूध घेऊन गॅसवर उकळत ठेवा.

२. एका बाजूला थोडेसे गरम दूध एका वाटीत काढून त्यात केसरच्या काड्या भिजत ठेवा. आता उकळलेल्या दुधात भिजवत ठेवलेला साबुदाणा घालावा.

३. त्यानंतर तो दुधात चांगला शिजवून घ्यावा. लक्षात ठेवा शाबू शिजवत असताना गॅस मंद आचेवर ठेवा. अथवा तळाला लागण्याची शक्यता असते.

४. साबुदाणा काचेप्रमाणे चकाकेपर्यंत तो शिजवत राहा. शिजल्यानंतर त्यामध्ये वर घेतलेल्या प्रमाणात साखर घाला. साखर घालून सर्व मिश्रण दुधात एकजीव करा. त्यांनंतर गॅस बंद करा.

हेही वाचा >> Shravan special: श्रावण स्पेशल साबुदाणा रबडी; सोपी रेसिपी नक्की ट्राय करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. आता यामध्ये घेतलेले बदाम, काजू, पिस्ता यांसारखे उपवासाला चालणारे ड्रायफ्रूट्स घाला. शिवाय वरून केसरचे दूध त्यात टाका. ही बासुंदी पुन्हा हलवून एकजीव करा. अशाप्रकारे तयार आहे उपवासात खाता येणारी साबुदाण्याची बासुंदी.