
विवेक सेतू त्यांनीं बांधिला उतरून गेले शायीरे अशा शब्दांत नाथराय विशद करतात डाव जिंकण्यासाठी संतविभूतींनी अंगीकारलेल्या व्यूहरचनेचा. ‘आडवा होणारा’, ‘टेकणारा’…


मंत्री समतोल बुद्धीचा व नि:स्पृह असेल तरच राज्याची मंत्रणा लोकाभिमुख राहणे शक्य बनते.

भक्तीचा गाभा हातवटी आला की अवघ्या साधनेचे अधिष्ठान असणारी चित्तशुद्धी त्यांद्वारे साधते, अशी तुकोबांची निरपवाद साक्षच होय.


तुमची-आमची जगाकडे बघण्याची दृष्टी आणि संतांची विश्वाकडे बघण्याची नजर या दोहोंतील मुख्य फरक हाच.


साहजिकच मग, रामा जनार्दनांनी रचलेल्या आरतीमधील ‘पंक्ती लोपले ज्ञान जनीं’ अशी वाचावी लागते अथवा वाचावी लागेल.


या वरपंग विरोधाभासाची उपपत्ती लावायची तर आपल्याला पुन्हा वळावे लागते नाथांकडे आणि ज्ञानदेवांकडेही.

रूपाद्वारे सूचन घडते ते घनीभूत अस्तित्वाचे. त्यामुळे, साकाराचे अनुसंधान राखणे व टिकवणे हे तुलनेने सोपे.

