
वरपंग बडिवारापेक्षा परमार्थाच्या प्रांतात सर्वाधिक महत्त्व भावशुद्ध भजनाला असते, या वास्तवाकडे संकेत आहे तुकोबारायांचा.


मध्यमेच्या बेटी खुंटे तारू ही सोपानदेवांची साक्ष विलक्षण मार्मिक शाबीत होते या संदर्भात.





चारही मुक्तींच्या गाथा ही आत्मनिवेदन पर्यवसायी अभेदभक्ती डौलाने मिरवते, असे नाथराय म्हणतात ते काय उगीचच!

एकविध अभ्यासाच्या पर्वादरम्यान शारीरिक उपाधींकडे दुर्लक्ष करणे भागच असते विद्यार्थ्यांला.


अष्टमीच्या मध्यरात्री आदिशक्ती प्रत्यक्ष प्रगटते आणि तिच्या आशीर्वादाच्या बळावर दशमीच्या दिवशी रावणवध करून प्रभू श्रीराम विजयी होतात

मुख्य म्हणजे शत्रू प्रगट असतो आणि तो उघड उघड हल्ला करतो. संन्याशाचे युद्ध असते ते अंत:शत्रूंशी.
