‘जगणं वाहून जाताना!’ हा लेख व सोबतचे वृत्तांकन (रविवार विशेष- २८ सप्टेंबर) अस्वस्थ करणारे आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा, सोलापूर तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील अतिवृष्टीची चर्चा करताना एका वास्तवाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे आणि ते म्हणजे बदलते पर्जन्यमान! तापमानवाढ आणि हवामान बदल यांचा परस्परसंबंध आहे हे वास्तवच आपणास गम्य नाही. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने ‘अॅसेसमेंट ऑफ क्लायमेट चेंज ओव्हर इंडियन रीजन’ शीर्षकाचा अहवाल मध्यंतरी प्रसिद्ध केला असून वाढत्या प्रदूषणामुळे एकविसाव्या शतकाअखेर भारताच्या सरासरी तापमानात किमान १.१ अंशांनी वाढ होणार असल्याचे म्हटले आहे. ज्यावेळी हवेचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढते, तेव्हा त्यात सात टक्के अधिक बाष्प धरून ठेवण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे येणाऱ्या पर्जन्यमानाचे स्वरूप आणखी भीषण होणार असल्याचे सर्वच पर्यावरणतज्ज्ञांचे एकमत झाले आहे. प्रत्येक ?तू अतिरेकाचे टोक गाठतो आहे आणि हा ?तुसंहार थांबवायचा असेल तर सर्वप्रथम निसर्गद्रोही विकासकामांना शिस्त लावून पर्यावरणाची बूज राखणे गरजेचे आहे.
● बाळकृष्ण शिंदे, पुणे</p>
‘रोहयो’तून जमिनीची कामे व्हावीत
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात शेतजमिनीची धूप होऊन शेती करण्यालायक जमीन राहिली नाही, तर काही ठिकाणी प्रचंड गाळ, चिखल शेतात आल्यामुळे शेत जमीन व शेतातील विहिरीही गाळाने तुडुंब भरल्या आहेत. जमीन पुन्हा लागवडीलायक बनवण्यासाठी येणाऱ्या प्रचंड खर्चाचा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या पीक विमा वा नुकसान भरपाईच्या मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. सरकारने रोजगार हमीच्या माध्यमातून, जमीन लागवडीयोग्य बनवण्यासाठी शेतातील बुजलेल्या विहिरींतील गाळ उपसण्यासारखी कामे काढली तर त्या भागातील गरजूंना रोजगारही मिळेल व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत केल्यासारखे होईल.
● रमेश वनारसे, शहापूर (जि. ठाणे)
आत्महत्यांनंतर चेक देण्याऐवजी…
दिवसरात्र राबून हाताशी आलेल्या पिकांना मागील १५ दिवसांपासून वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसून सोयाबीन, कांदा, ऊस, द्राक्षे, भाजीपाला होत्याचे नव्हते झाले. सध्या सोयाबीनसाठी एकरी ३४०० रु. मदत जाहीर झाली आहे, पण १ एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करायची तर- ३० किलो बियाणे पिशवी ३००० रुपये, पेरणी खर्च २००० रु., खते ३००० रु., कोळपणी, खुरपणी ५००० रु. आणि फवारणी ५००० रु, असा एकरी २० हजार रु.पेक्षा जास्त उत्पादन खर्च होतो. पिकांचे १०० टक्के नुकसान झाले असल्याने सरसकट हेक्टरी कमीत कमी ५०,००० रुपये आणि बायागत क्षेत्रासाठी कमीत कमी एक लाख रु. मदत जाचक अटी वा नियम न लावता जाहीर करावी आणि अडचणींचे निकष वगळून मागच्या वर्षी जसा पीक विमा कंपनीने निकष ठेवला होता तसाच यंदा ठेवावा, याची गरज आहे. हेक्टरी ८५०० रुपये तोकडी मदत करून मायबाप शेतकरी बांधवांची थट्टा केली जात आहे. ‘न केलेल्या कामाच्या जाहिरातीसाठी’ कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या शासनाकडे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसे नसल्याची सबब, हा विरोधाभास म्हणावा लागेल. भरपाई वेळेत मिळाली तरच उपयोग. कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्यानंतर सांत्वन म्हणून चेक देण्याऐवजी शेतकरी जिवंत असताना त्या
● दत्तात्रय पाचकवडे-पाटील, चिखर्डे (ता. बार्शी. जि.- सोलापूर)
संपूर्ण कर्जमाफी हाच उपाय
‘जगणं वाहून जाताना!’ हा लेख व अन्य वृत्तान्त (रविवार विशेष- २८ सप्टेंबर) वाचले. देशभरात सरासरीपेक्षा ८ टक्के पाऊस जास्त झाला आहे. अगदी लवकर म्हणजे मेमध्ये सुरू झालेल्या पावसाने मशागतीअभावी निम्मी खरिपाची पेरणीच झाली नाही. उरलेला निम्मा खरीप जो डोळ्यासमोर उभा आहे तोही अतिवृष्टीने धोक्यात. अशा वेळी चिंताक्रांत बळीराजाला उभारी द्यायची तर सरकारने कागदी घोडे न नाचवता संपूर्ण कर्जमाफीशिवाय नव्याने अर्थसाहाय्य देऊन त्याला प्रथम उभे करायला हवे.
● श्रीकांत मा.जाधव, अतीत (जि.सातारा)
पीडित जनतेच्या जिवावर उठण्यासारखेच…
‘श्रीमंत तिरुपतीला महाराष्ट्र सरकारचे भूदान’ ही बातमी (लोकसत्ता- २८ सप्टेंबर) वाचली. तिरुपती देवस्थानाला दरवर्षी रोकड दान रूपाने कमीत कमी २० ते २५ कोटी रु. आणि शेकडो तोळ्यांचे दागिने मिळतात. अशा देवस्थानाने महाराष्ट्राला यापूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीत कधी काही मदत केली आहे काय? इकडे बाधित जनतेला तुटपुंजी मदत देऊन आमचे सरकार उदारपणे सरकारची एक लाख चाळीस हजार कोटीची जमीन कवडीमोल भावाने फक्त १४ हजार रुपयात पद्मावती देवस्थान मंदिराचे पैसे थकविणाऱ्या गर्भश्रीमंत देवस्थानाला विकत आहे. ही जमीन एखाद्या पंचतारांकित हॉटेलला विकली असती तर कोट्यवधी रुपये मिळाले असते व ते ओला दुष्काळ पीडितांना देता असते. ते न करता हा ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ सारखा सरकारी जमिनीचा व्यवहार करणे पीडित जनतेच्या जीवावर उठण्यासारखेच आहे.
● सुधीर ब देशपांडे, ठाणे
प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही मानायचे?
‘सोनम वांगचुक यांना रासुका’ आणि ‘पाकिस्तानशी संबंधांचा आरोप’ या बातम्या (लोकसत्ता- २७ व २८ सप्टें.) वाचल्या. स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि घटनेतील सहाव्या परिशिष्टानुसार संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी लडाखमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे प्रक्षोभक भाषण जबाबदार असल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकार थांबलेले नाही. वांगचुक महात्मा गांधींच्या अहिंसात्मक मार्गाने उपोषण करणारे, रॅमन मॅगसेसे व रोलेक्स अवॉर्ड फॉर इंटरप्राइज पुरस्कारप्राप्त कार्यकर्ते, लडाखमधील शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक, संशोधक- असा माणूस राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका कसा असू शकतो? ‘माझ्या पाच वर्षांच्या अहिंसक सत्याग्रहाला गालबोट लागले हे दु:खद आहे. हिंसा चालणार नाही’ असे स्पष्ट आवाहन वांगचुक यांनी केले असूनही त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक कशासाठी? याच वांगचुक यांनी यापूर्वी, चीनने भारताचा मोठा भूभाग हडप केला, ही स्पष्टोक्ती केली होती. जो कोणी प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही म्हणणे, मोदी-शहांच्या विरोधात म्हणजे देशाच्या विरोधात मानणे, ही विकृत संस्कृतीच देशात रुजवून जागतिक पातळीवरच्या सा
● राजेंद्र पाडवी, नंदुरबार
आंदोलन दडपण्याचा निर्लज्ज मार्ग
सोनम वांगचुक यांना अटक करून त्यांच्यावर रासुका लावून केंद्र सरकारने आपल्या दडपशाही व हुकूमशाही धोरणांचा एक आविष्कार घडवला आहे. लडाखच्या अत्यंत न्याय्य मागण्यांसाठी चालवत असलेले आंदोलन अत्यंत क्रूर रीतीने दडपण्याचा हा निर्लज्ज मार्ग सरकारने अनुसरला आहे. वांगचुक यांच्या कर्तृत्वाकडे पाहताना कौतुकाने मन भरून येते. अशा राष्ट्रभूषण नागरिकाची अवहेलना करणाऱ्या सत्ताधीशांच्या पापांचा घडा भरून ऊतू गेला आहे. याविरोधात देशभर निषेध मोर्चे निघत कसे नाहीत, याचेच सखेद आश्चर्य वाटते.
● अजित क्षीरसागर, मुंबई</p>
क्रिकेट पंचांचा चेहरा हरवतो आहे…
‘हेडमास्तरांचे हरपणे!’ हे संपादकीय (२७ सप्टें.) वाचले. पंच डिकी बर्ड यांचे क्रिकेट मधील आदरणीय व शिस्तप्रयि स्थान निर्विवाद, पण जग बदलत चालले तसतसा खेळ व खेळातील नियमांविषयी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही प्रचंड प्रमाणात वाढू लागला आहे. क्रिकेटमध्ये प्रचंड पैसा ओतला गेल्याने, यशस्वी होण्यासाठी वा जिंकण्यासाठी अनियमित प्रकार बघायला मिळतात. रिव्ह्यू, थर्ड अम्पायर ही तंत्रज्ञानाची मदत घेऊन निर्णय देण्याची पद्धत सुरू झाल्यापासून चुकूनच कोणा पंचांचे नाव डोळ्यांसमोर येते. या पार्शवभूमीवर डिकी बर्ड अथवा अगदी शेवटचे विख्यात पंच सायमन टॉफेल हीच नावे भावी पिढीच्या स्मरणात राहातील असे वाटते. क्रिकेट पंच हा आधीच ‘थँकलेस जॉब’ करणारा; पण आज त्याचाच चेहरा हरवतो आहे याची खंत वाटते.
● सुबोध दणर्े, उरण