सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे. एप्रिल ते मे या दरम्यान मतदान होणार आहे. एकूण सात टप्प्यांत मतदान होणार असल्यामुळे प्रत्येक मतदारसंघात प्रचारासाठी साधारण १५ दिवस मिळतील. पण संपूर्ण देशाचा विचार करता एक महिना निवडणूक प्रचार सुरू राहणार आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांकडून प्रचाराची वेगवेगळी तंत्रे, पद्धती वापरल्या जातील. मतदाराला आकर्षित करण्यासाठी सामाजिक संपर्कमाध्यमे, जाहीर सभा, पोस्टर्स, रॅली, सर्वेक्षणे, मुलाखती, चर्चा, संवाद, गाठीभेटी, सहविचार सभा इत्यादींद्‌वारे प्रचार सुरू झाला आहे. या सर्व कृतींत राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या मानसिक व बाजारधिष्ठित तंत्रांचा वापर करून आभासी सत्य (virtual reality), अपप्रचार (propaganda), पूर्वग्रह दृढीकरण (confirmation bias). भूतकाळात रमणे (nostalgia), आकर्षक फसव्या घोषणा, प्रभाव, प्रायमिंग (priming), साचेसंबंद समज (stereotype) इ. मानसशास्त्रीय पद्धती वापरून राजकीय प्रचाराची आखणी केली जाते. सर्वच राजकीय पक्ष मतदाराच्या मेंदूचा किंवा मानसिकतेचा आधी अभ्यास करून प्रचारयंत्रणा राबवतात. बाजारात एखा‌द्या वस्तुची विक्री वाढविण्यासाठी अनेक तंत्रे वापरून तशा जाहिराती केल्या जातात आणि त्यामुळे आकर्षित होऊन वस्तुचा खप वाढवला जातो. तशाच प्रकारची व्यूहनीती निवडणुकात वापरण्याचा प्रघात पूर्वीपासूनच आहे पण तो आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आज प्रत्येक तरुणाकडे व काही ज्येष्ठांकडे स्मार्टफोन आल्यामुळे राजकीय पक्षांना प्रत्यक्ष मतदारापर्यंत न पोहचता आपल्या मीडिया वॉर रुमच्या माध्यमातून मेसेज, व्हिडीओ, रिल्स, मीम्स इ.‌द्वारे प्रचार कमी वेळात, कमी खर्चात करता येणे शक्य झाले आहे. या काळात अनेक इंटरनेट डाटा पुरविणाऱ्या कंपन्या कमी पैशांत जास्त डेटा देण्याच्या ऑफर देत आहेत.

अलीकडे निवडणुकांचा प्रचार, उमेदवाराची प्रतिमा, मतदारांचे मत बनविणे, निवडणूक वातावरण निर्मिती, उमेदवाराच्या कार्याच्या रिल्स इ. निवडणूक प्रचारविषयक कामे करून देणाऱ्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. ज्यामध्ये प्रशांत किशोर यांची सीएजी (सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्स) ही कंपनी मीडिया आणि पब्लिसिटीचे काम करते. तसेच आय-पॅक ही कंपनीसुद्धा निवडणूक प्रक्रियेत तरुणांना तंत्रज्ञानाने आकर्षित करून प्रचारास लावते. यासोबतच देशात, जगात पुढील कंपन्या/नवउद्यम या निवडणूक मोहिमा राबवून देण्याचे काम करत आहेत. उदा. GearBob, Ballotnow. raglitzvote, Callthub, Corelnsights Al, Perfect Media, Munadi Communication. Postickers, Infovote इ. या कंपन्यांच्या संकेतस्थळावर गेल्यास तुम्हाला त्यांची संपूर्ण माहिती मिळते. काही श्रीमंत राजकीय पक्ष या कंपन्यांशी सामंजस्य करार करून निवडणुकीत सहकार्य घेत आहेत.

semiconductor aggreement india singapur
पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा भारतासाठी कसा ठरेल फायदेशीर? देशातील सेमीकंडक्टर उद्योगासाठी ही भेट किती महत्त्वाची?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Strong economic growth opportunities Financial sector in economics
लेख: …तरच सशक्त आर्थिक वाढीच्या भरपूर संधी!
Narendra modi fintech india marathi news
भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
Suicide attempt due to mental stress is not a crime
मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही…
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
isro mission SSLV D3
UPSC Key : यूपीएससी सूत्र : ISRO च्या SSLV-D3 मोहीमेचे महत्त्व अन् कर्करोगावरील औषध भारतात आणण्याबाबतचे नियम, वाचा सविस्तर…

हेही वाचा : चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध अफवांचा उच्छाद

यासोबतच काही राजकीय पक्ष निवडणूक पूर्वचाचणी घेण्यासाठी या वरील कंपन्यांची मदत घेत आहेत. उमेदवाराच्या तिकीट वाटपातही त्या उमेदवाराची गुप्त पद्धतीने माहिती संकलित करून ते पक्षाला देतात. या कंपन्यांशी एकदा करार झाला की त्या कंपन्या उमेदवाराचे प्रतिमासंवर्धन करून देतात. उमेदवार एखाद्या क्षेत्रात कमकुवत असेल तर तिथे भर घालून कमतरता दूर केल्या जात आहेत. आज प्रत्येक उमेदवार खासगीत स्वतः अशा कंपन्यासोबत करार करून आपली प्रसिद्धी घडवून आणत आहे. तसेच काही उमेदवार वैयक्तिक मीडिया सल्लागार नेमून समाजमाध्यमांवर उमेदवाराची ‘विकास पुरुष’’ अशी प्रतिमा निर्माण करत आहेत.

या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाकडून मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर केला जातो. नॉस्टेलजिया या तंत्राचा वापर करून भूतकाळातील, इतिहासातील गोष्टी, वैभव, स्थान, घोषणा, घटना-प्रसंग इ. प्रचारात आणून मतदारांना गुंतवून ठेवले जात आहे. उदा: काल्पनिक शत्रू निर्माण करणे, तुलनात्मक विकासाची आभासी आकडेवारी दाखविणे, धार्मिक भावनांना हात घालणे, इतिहासात झालेला अन्याय दाखविणे, प्राचीन संस्कृतीचे गौरवीकरण, जुन्या घटनांना उजाळा देणे इ. ज्यामुळे मतदार भावनिक होऊन त्या काळापुरते संमोहित होतात व नकळत मतदान करून जातात. कन्फर्मेशन बायस या तंत्राचाही वापर केला जातो. जनतेच्या मनात बरेच कन्फर्मेशन बायस (पूर्वग्रह दृढीकरण) असतात. त्यासंदर्भाने प्रचारात त्याचा वापर केला जातो. उदा: जातीय, सांप्रदायिक दंगली घडवणे, लव्ह जिहाद, घराणेशही, अल्पसंख्याकांबद्दलचे प्रेम, आदिवासी व स्त्रियांबद्दलचा कळवळा इ. विषय प्रचारात घेऊन लोकांची मते राजकीय पक्षातर्फे घडविली जातात. ज्यामुळे मतदारांचे पूर्वगृह दृढ होऊन ते मतदान करतात. साचेबद्ध मानसिकता (stereotype) ज्यामध्ये एखा‌द्या माणसाविषयी किंवा गोष्टीविषयीची प्रत्यक्षात खरी नसणारी अशी ठराविक कल्पना, समज घडविला जातो. उदा. लव्ह जिहाद, आरक्षण विरोधक, संस्कृती विरोधक, अल्पसंख्याक विरोध इ.

हेही वाचा : डॉक्टरांच्या अत्यावश्यक सेवेचे महत्त्व नाकारण्याऐवजी हे करा…

निवडणुकीच्या काळात जनतेच्या सामान्य बुद्धीला गृहीत धरून शासनाचे सर्व अहवाल तयार केले जातात. तसेच बरेच अहवाल भावनिक व सांस्कृतिक स्मृतींद्वारे मतदारांना प्रभावित करतात. त्यासाठी इतिहासातील अनेक प्रसंग पुनर्जिवीत केले जातात उदा : शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमधून आणणे, बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधील घर खरेदी करणे, राम मंदिर बांधकामाचे वचन पूर्ण करणे इ. प्रायमिंग व अफेक्ट या संकल्पनां‌द्वारे प्रतिस्पर्धी उमेदवाराबद्दल लोकांची मने तयार केली जातात. या वरील तंत्राचा वापर अपप्रचार (propoganda) केला जातो. निवडणूक प्रचारात अपप्रचार हे अत्यंत प्रभावी हत्यार प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा पक्षाविरोधात वापरले जाते. इतिहासात या तंत्राचा वापर बऱ्याच जणांनी केलेला दिसतो. उदा विविध देशांच्या गुप्तचर यंत्रणा. हिटलरने युद्ध आणि ज्युंचा विरोध यासाठी प्रोपगंडचा मोठ्या प्रमाणात वापर केला होता. प्रोपगंडात विशिष्ट धारणेला प्रोत्साहन देण्यासाठी निवडक तथ्ये सादर केली जातात. तसेच तर्कसंगत प्रतिसाद देण्याऐवजी भावनिक भाषा वापरली जाते. असा प्रचार वस्तुनिष्ठ नसतो. यामध्ये प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांबद्दल नकारात्मक चित्र समाजमाध्यमांवर रेखाटले जाते. तसेच खोटे प्रेम दाखवले जाते. उदा. निवडणुकीच्या काळात सैनिक, देवदेवतांबद्दल आदर, भ्रष्टाचाराबद्दल तिटकारा, राष्ट्रभक्ती इत्यादीसंदर्भात समाजमाध्यमांतून राजकीय प्रचार केला जातो. उदा. टॅगलाईन (घोषवाक्य), हॅशटॅग (संख्याचिन्ह), रील्स (चलचित्र), मीम्स इ. जगभरात काही प्रसिद्ध समाजमाध्यमांचे प्रचारतंत्र (वेबसाईट) आहेत उदा. Bit-ly, Sendible, Canva, Crowd fire, Sprinkler, Buffer, Has-suite, Social pilot इ. याच्या जोडीला आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित समाजमाध्यम सॉफ्टवेअर मॅनेजमेंट टूल्सही आहेत. उदा. Feedhive, Vista Social, Fiick Jweet Hunter इ. सोशल मीडिया सॉफ्टवेअरचा राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. सामान्य माणसाचा याच्याशी प्रत्यक्ष संबंध नसतो किंवा त्याला याविषयी फारशी माहिती नसते. पण अलीकडे प्रत्येक मतदाराचा स्क्रीन टाइम वाढल्यामुळे या सॉफ्टवेअर कंपन्या मोठ्या प्रमाणात डिजिटल राजकीय प्रचारावर भर देत आहेत.

एकविसाव्या शतकात लोकांचे सार्वजनिक मत किंवा समूहमत (community opinion) हे निवडणूक प्रचारात महत्त्वाचे ठरते. पूर्वी लोकमत पारंपरिक आधारावर घडत असे, पण आज सामाजिक माध्यमांचा वापर वाढल्यामुळे या तंत्राला फार महत्त्व आले आहे. यावरून मतदाराचे वर्तन समजून घेता येते. समूहमत पाहून कधी-कधी व्यक्ती निर्णय घेत असते. आज राजकीय पक्ष समूहमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा वातावरण निर्मिती करणे उदा. भारत जोडो यात्रा किंवा न्याय यात्रेचे आयोजन, सीएए, एनआरसी कलम ३७० रद्द, समान नागरी कायदा इ. द्वारे विशिष्ट विचारप्रणाली तयार करून त्याविरोधात समूहमत तयार करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. अलीकडे बाजारपेठीय वस्तु विक्री तंत्राचा एक भाग म्हणून ‘मीडिया इनफ्युएन्सर’ प्रमाणेच राजकारणातही सामाजिक माध्यमांवर प्रत्येक राजकीय पक्ष प्रभावकाचा वापर करताना दिसतात. हे प्रभावक आपल्या कौशल्याने फेसबूक, एक्स, इन्स्टाग्राम, यूट्युब, पिंटरेस्ट, ब्लॉगच्या माध्यमातून फॉलोअर्सना प्रभावित करत असतात. राजकीय पक्ष या माध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात.

हेही वाचा : आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

एकूणच १८ व्या लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका त्यातील राजकीय डिजिटल प्रचार यासाठी वेगवेगळ्या मार्केट व मानसिक तंत्रांचा वापर करून प्रचारयंत्रणा राबवल्या जात आहेत. प्रचाराचे पारंपरिक स्वरूप बदलून ते अधिक संत्रज्ञानस्नेही झाले आहे. अल्गोरिदम-सर्च इंजिन या तंत्राचा वापर करून राजकीय प्रचार डिजिटलाईज होऊ लागला आहे. राजकीय गणितांपेक्षा राजकीय रसायनशास्त्र निवडणुकांत फार महत्त्वपूर्ण ठरते. एखादी साधी किंवा वाईट घटना समाजमाध्यमांतून व्हायरल होऊन राजकीय फायदा उठवता येऊ शकतो. म्हणून डिजिटल प्रचारयंत्रणा आज महत्त्वपूर्ण ठरत आहे.

(लेखक उदगीर येथील शिवाजी महावि‌द्यालयात प्राध्यापक आहेत.)