कृष्णकुमार निकोडे

पॅरिस येथे सन २०००मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद ठरली. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेव्हापासून ४ फेब्रुवारी हा कर्करोग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. त्यानिमित्त कर्करोग प्रतिबंध, या क्षेत्रातील शोध आणि उपचार याविषयी जनजागृती केली जाऊ लागली.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Income tax now on loans overdue for more than 45 days of business
उधारीच्या नव्या नियमाने वस्त्रोद्योगाचे धागे विस्कटले ! ४५ दिवसांहून अधिक काळ थकलेल्या उधारीवर आता प्राप्तिकर

जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरीत्या कमी करणे, हे आहे. ज्यांना कर्करोगावरील उपचार मिळत नाहीत, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याची एक संधी म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे पाळला जातो. जागतिक कर्करोग दिन चुकीच्या माहितीला लक्ष्य करतो, जागरुकता वाढवतो आणि कर्करोगाविषयीचे पूर्वग्रह दूर करण्यासाठी प्रयत्न करतो. या निमित्ताने कर्करोगा झालेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यापैकी एक चळवळ आहे ‘नो हेअर सेल्फी’. कर्करोगावरील उपचारांचे शरीरावर अनेक घातक दुष्परिणाम होतात. यातील सर्वांत सामान्य दुष्परिणाम म्हणजे रुग्णाचे केस मोठ्या प्रमाणात गळतात आणि एका टप्प्यावर त्यांना टक्कल पडते. त्यातून येणाऱ्या नैराश्याचा सामना करण्यासाठी एक प्रतिकात्मक उपक्रम हे ‘नो हेअर सेल्फी’चे उद्दीष्ट आहे. मुंडन करण्याची ही जागतिक चळवळ आहे. त्यात सहभागी होणारे आपल्या प्रतिमा सर्व समाज माध्यमांवरून प्रसारित करतात. जगभरातील अनेक व्यक्ती यात भाग घेतात. अनेकजण कर्गरुग्णांसाठी केसांचा टोप (विग) उपलब्ध व्हावा या हेतूने आपले केस दानही करतात.

हेही वाचा : विनाशाच्या उंबरठ्यावरून मागे फिरण्याचं शहाणपण मानवजात दाखवेल का?

जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात ४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिस येथे झालेल्या जागतिक कर्करोग शिखर परिषदेपासून झाली. ‘पॅरिस अगेन्स्ट कॅन्सर’ची सनद, जी संशोधनाला चालना देण्यासाठी, कर्करोग रोखण्यासाठी, रुग्ण सेवा सुधारण्यासाठी तयार करण्यात आली होती, त्यामध्ये दस्तऐवजाच्या अधिकृत स्वाक्षरीचा वर्धापनदिन म्हणूनही जागतिक कर्करोग दिन पाळला जाऊ लागला. या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद ठरली. या परिषदेत जगभरातील शासकीय उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्करोगविषयक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी पॅरिसच्या कर्करोगविषयक सनदेला मान्यता दिली. प्रस्तुत सनद कर्करोगसंबंधित संशोधन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता आर्थिक गुंतवणूक करणे, कर्करोगग्रस्तांचे जीवनमूल्य उंचावणे तसेच त्यांना योग्य उपचार देणे अशा तत्त्वांचा पुरस्कार करते.

कर्करोगविषयक उपलब्ध माहिती तसेच कर्करोगाचे निदान आणि उपचार यांत झालेली लक्षणीय प्रगती यांमुळे रोगप्रसारावर वर्षागणिक अधिकाधिक नियंत्रण मिळविता येणे अपेक्षित होते. परंतु जागतिक आकडेवारीनुसार दरवर्षी कर्करोगाचे निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत नव्याने भर पडत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोगासंदर्भातील माहितीचा प्रसार करून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी राखता येऊ शकते. यासाठी कर्करोग प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने जगभरातील या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि आरोग्य संघटना हा दिवस साजरा करतात.

हेही वाचा : कथित देशहितासाठीचे हत्याकांड

कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे ७० टक्के मृत्यू हे अल्पविकसित देशांमध्ये होत असल्याने अशा ठिकाणी कर्करोग आणि त्याचा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस हे एक महत्त्वाचे साधन ठरत आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना- ‘युनियन फाॅर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल, यूआईसीसी’ ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोगावर नियंत्रण राखण्यासाठी आणि पर्यायाने जागतिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यशील असते आणि ही संघटना, जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिवसाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना जागतिक कर्करोग दिवसानिमित्त एक संकल्पना (थीम) जाहीर करते. या संकल्पनेला अनुसरून विविध आरोग्य संस्था आणि कर्करोग उपचार केंद्र यांद्वारे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या संस्थांद्वारे त्यांच्या संकेतस्थळांवर कर्करोगाविषयी माहिती प्रसारित केली जाते. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघटना स्थानिक आरोग्य संस्थांच्या साहाय्याने संमेलने, व्याख्याने, प्रदर्शने तसेच निधी उभारणी इत्यादी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करतात. काही देशांमध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांद्वारे ४ फेब्रुवारी किंवा त्या आठवड्यात कर्करोगविषयक विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात.

हेही वाचा : बाजारकेंद्री, तरीही क्रांतिकारी कला…

जागतिक कर्करोग दिवसानिमित्त सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्नांतून कर्करोगाचा जनजीवनावरील दुष्परिणाम कमी करता येऊ शकतो, तसेच कर्करोगाबाबत गैरसमज दूर करता येऊ शकतात. कर्करोग हा प्रतिबंधात्मक आजार आहे; कर्करोगप्रतिबंधाविषयी वैयक्तिक बांधिलकी, अशा विविध विषयांना अनुसरूनदेखील रूपरेखा योजण्यात येतात.