scorecardresearch

ठाणे

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
dombivli marathi news, ayregaon chawl demolished marathi news
डोंबिवलीत आयरेगावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त, मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई प्रीमियम स्टोरी

म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिव यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे.

kalyan police marathi news, kolsewadi police marathi news
कल्याण, ठाणे, मुंबईत १४ वर्ष घरफोड्या करणारा सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली परिसरात मागील १४ वर्ष घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला येथील कोळसेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक…

thane police officer arrested marathi news
ठाणे: दोन लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह दोघे ताब्यात

पोलीस उपनिरीक्षक तुषार पोतेकर (४०) आणि पोलीस हवालदार माधव दराडे (४९) अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

candidature form, Mumbai, Thane,
मुंबई, ठाण्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात, तरीही मतदारसंघ, उमेदवार ठरेनात

राज्यातील पाच टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या (शुक्रवार) सुरुवात होत असली…

Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी

राज्य परिवहन सेवेत (एसटी) बनावट प्रमाणपत्राच्या आधारे अनुकंपा तत्त्वावर लिपीक पदावर सेवेत दाखल झालेल्या ३६ वर्षीय कर्माचाऱ्याविरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी…

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची पिण्याच्या पाण्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणाने ग्रासले असून त्याचे परिणाम अगदी गडदपणे दिसू लागले…

मुंबई, ठाण्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटेना

‘अबकी बार, ४०० पार’च्या घोषणा महायुतीने दिल्या असल्या तरी मुंबई-ठाणेसह काही जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही.

bhiwandi lok sabha marathi news
भिवंडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काँग्रेसशी अजूनही सूर जुळेना

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमदेवारी जाहीर होताच, प्रचाराला सुरुवात केली आहे.

Thane, election, police, preventive action thane,
ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, ४ हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, १५५ अवैध शस्त्र जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार हजार प्रतिबंधात्मक कारवाया केल्या…

Shindesena, thane,
शिंदेसेनेचे ठाण्यात पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन

शिंदेसेनेचे आमदार, खासदार असलेल्या मतदारसंघात महिला बचत गटाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे ‘रसद पेरणी’ केली जात आहे.

संबंधित बातम्या