एअर कंडिशनर्स (AC) हे उन्हाळ्यात, विशेषतः भारतात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या घरगुती उपकरणांपैकी एक आहे. आधुनिक एसी तुलनेने शक्तिशाली आणि ऊर्जा कार्यक्षम असल्याने या उपकरणाच्या विक्रीत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. एसीच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या वापराबाबत जागरूकताही वाढली आहे. पण, अजूनही काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एअर कंडिशनरबद्दल माहित नसतील. म्हणून अशा १० गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्हाला AC बद्दल माहित असणे आवश्यक आहे.

१.एसी चालू असताना सीलिंग फॅन मध्यम गतीवर ठेवल्यास खोली लवकर थंड होण्यास मदत होते.
एसी चालू असताना सीलिंग फॅन कमी किंवा मध्यम वेगाने चालू केल्याने खोली लवकर थंड होण्यास मदत होते. एकदा तुम्ही तुमचे AC चे तापमान ऑप्टिमट लेव्हलला सेट केल्यानंतर, थंड हवा खोलीत पसरवण्यासाठी पंखा देखील चालू केला पाहिजे. हे लक्षात घ्या की एसी चालू असताना जास्त वेगाने खोलीत पंखे वापरणे प्रतिकूल असू शकते कारण खोली थंड होण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
islamic information center marathi news, islam information
माणसाला माणसाशी जोडणारा एक फोन नंबर…

२. एसीच्या ऊर्जेची कार्यक्षमता दर काही वर्षांनी बदलते
भारतात ऋतूचक्रावर आधारे एसीच्या तापमानाचे मोजमाप केले जाते. हे CSTL (कूलिंग सीझनल टोटल लोड) आणि CSEC (कूलिंग सीझनल एनर्जी कन्झम्पशन) चे गुणोत्तर आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, ते एका वर्षात वापरल्या जाणार्‍या एकूण ऊर्जेशी AC काढून टाकू शकणार्‍या वार्षिक उष्णतेचे प्रमाण आहे. कोणत्याही AC चे तापमान २४ अंश ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान – बाहेरील तापमानावर आधारित सरासरी मोजली जाते. अशा प्रकारे, दर काही वर्षांनी एसीचे तापमान बदलते. याचा अर्थ असा की तुमचा 5-स्टार एसी पुढील वर्षी 5-स्टार एसी राहीलच याची काही शाश्वती नसते.

३. कमी तापमानात थर्मोस्टॅट सेट करणे म्हणजे चांगले कुलींग झाले असे नव्हे
लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा तापमानाची सेटिंग कमी होते तेव्हा एसी अधिक चांगले कूलिंग देतं. मात्र तसे होत नाही. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी (बीईई) नुसार, मानवी शरीरासाठी २४ अंश हे आदर्श तापमान आहे आणि सर्वात कमी तापमान सेटिंगच्या तुलनेत कोणताही एसी इतकं तापमान सेट करण्यासाठी कमी भार घेईल.

४. एसी सूर्यप्रकाशापासून दूर ठेवल्याने तिची कार्यक्षमता वाढते
तुमची खोली थंड ठेवणे हे एसीचे काम असले तरी, एसीला शक्य तितकं थंड ठेवलं तर तिची कार्यक्षमता वाढू शकते. तुमचा एसी थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवल्यास किंवा सावलीत ठेवल्याने जास्त गरम होण्यापासून वाचतो आणि त्यामुळे एसीला चांगले कुलिंग देणे देखील सोपे होते. एसी चालू करण्यापूर्वी खूप गरम असल्यास, खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

५. घाणेरडे फिल्टर एसीची कूलिंग कमी करू शकतात आणि वीज बिल वाढवू शकतात
घाणेरडे एसी फिल्टर हवेच्या कुलिंमध्ये अडथळा आणू शकतात. यामुळे, एसीला खोली थंड करण्यास जास्त वेळ लागतो. परिणामी वीज बिल मोठ्या प्रमाणात येऊ शकतो. तुम्ही तुमचे एसी फिल्टर स्वच्छ ठेवावे असा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांनी सुचवले आहे की, हवेचा प्रवाह आणि थंड होण्यासाठी तुम्ही दर दोन आठवड्यांनी फिल्टर स्वच्छ करा.

६. खोलीतील लोकांची संख्या AC च्या कूलिंगवर परिणाम करते
तुमच्या लक्षात आले असेल की रेस्टॉरंट, थिएटर किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अनेक एसी चालू असले तरी, जितके लोक त्या ठिकाणी असतात तितके कुलिंग हळूहळू कमी होत जाते. एखाद्याला असं वाटू शकतं की एसीची कूलिंग कार्यक्षमता खोलीच्या आकारावर आणि एसीच्या क्षमतेवर अवलंबून असते, परंतु खोलीतील लोकांची संख्या देखील कुलिंगवर परिणाम करते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, खोलीत जितके जास्त लोक असतील तितके कुलिंग होण्याची गती कमी होईल.

७. अशा एसीला वर्षानुवर्षे सर्व्हिसची गरज नाही, असं म्हणतात…
बहुतेक कंपन्या दावा करतात की त्यांच्या AC ला सर्व्हिसची आवश्यक नसते. परंतु ही एक मिथक आहे. अशी शिफारस केली जाते की तुम्ही तुमच्या AC ची नियमितपणे सर्व्हिसिंग करा. भारतामध्ये AC वर्षभर वापरली जात नाही आणि वापरात नसताना ते धूळखात पडते. तुमचा AC ची सर्व्हिस केल्याने त्याची कूलिंग कार्यक्षमता वाढेल परिणामी कमी उर्जेचा वापर होईल.

८. रिमोट कंट्रोलमुळे AC बंद होत नाही
रिमोटचे बटण दाबताच आपला एसी ताबडतोब थंड व्हावी असं आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं. हे घडण्यासाठी बरेच लोक रिमोट कंट्रोलवरून एसी बंद करतात आणि मेन स्विच बंद करत नाही. यामुळे ‘निष्क्रिय भार’ स्वरूपात विजेचा अपव्यय होतो. कारण या स्थितीत कॉम्प्रेसर निष्क्रिय ठेवला जातो जेणेकरून एसी चालू केल्यावर तो त्वरित पुन्हा सुरू होऊ शकेल.

९. इन्व्हर्टर एसीचा बॅटरी इन्व्हर्टरशी काहीही संबंध नाही
इन्व्हर्टर एसींना असे म्हटले जाते कारण ते त्यांच्या कंप्रेसरची वीज पुरवठ्याची वारंवारता समायोजित करून त्यांची कुलिंग क्षमता बदलू शकते असे तंत्रज्ञान वापरले जाते. इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर दोन्ही एसी बॅटरीच्या इन्व्हर्टरवर चालू शकतात. जर बॅटरी एसीचा भार उचलण्यासाठी पुरेशा प्रमाणात असतील तर हे शक्य आहे.

१०. ‘स्टेबिलायझर-फ्री’ एसीचा अर्थ असा नाही की तुम्हाला स्टॅबिलायझरची अजिबात गरज नाही
आजकाल अनेक एसी ‘स्टेबिलायझर-फ्री एसी’ असल्याचे म्हटले जाते. याचा अर्थ असा नाही की या AC मध्ये व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे आणि त्यांना त्याची गरज नाही. एक व्होल्टेज स्टॅबिलायझर AC मध्ये लोडसाठी सतत व्होल्टेज पातळी स्वयंचलितपणे राखण्यासाठी डिझाइन केलेले आहे जेणेकरून अवाजवी पॉवर फेल्युअर होऊ नये. जर तुम्ही राहता त्या भागात ऑपरेटिंग व्होल्टेज मर्यादेपेक्षा जास्त व्होल्टेजचा चढ-उतार असेल तर व्होल्टेज स्टॅबिलायझर आवश्यक आहे.