Airtel Partnered With Apple : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची बरीच चर्चा आहे. अगदी एखादी सीरियल बघण्यापासून ते एखादी सीरिज बघण्यापर्यंत या प्लॅटफॉर्मचा उपयोग होतो. तर हे पाहता अनेक कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असतात. भारती एअरटेल कंपनीने ग्राहकांना ॲपल टीव्ही प्लस ॲपल म्युझिक युजर्सना (Apple TV+ Apple Music) ऑफर करण्यासाठी ॲपलबरोबर नवीन पार्टनरशिपची घोषणा केली आहे. भारतातील एअरटेल युजर्सना ॲपल टीव्ही प्लस ॲपल म्युझिक कंटेंट अॅक्सेस करता येईल. भारतातील मोबाइल व वायफाय ग्राहकांसाठी एअरटेलच्या मनोरंजन ऑफरमध्ये वाढ करणे हा या ऑफरचा उद्देश असणार आहे. तसेच या नवीन सेवा प्रीपेड, पोस्टपेड तसेच वायफाय प्लॅनद्वारे उपलब्ध असतील.
एअरटेल प्लॅन्सबरोबर ॲपल टीव्ही प्लस ॲपल म्युझिक :
एअरटेल एक्स्ट्रीमचे सदस्य आता निवडक वायफाय प्लॅन्सद्वारे ॲपल टीव्ही प्लस कंटेन्टचा आनंद घेऊ शकतात. एअरटेल एक्स्ट्रीम विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन ऑफर करते, जसे की.. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ, सोनी लाईव्ह, डिस्नी प्लस हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲपल टीव्ही प्लस इत्यादी. तर आता हे प्रीमियम वायफाय व पोस्टपेड प्लॅन्सच्या यादीत सामील होतील.
हेही वाचा…How to undo Gmail : एकदा पाठवलेला मेल आता ‘Undo’ करता येणार; फक्त ‘या’ चार स्टेप्स फॉलो करा
ॲपल म्युझिक, ॲपल टीव्ही प्लस, स्पोर्ट्स आणि बीट्स ॲपलचे उपाध्यक्ष ऑलिव्हर शुसर यांनी या पार्टनरशिपबद्दल उत्साह व्यक्त केला असून, “भारतातील एअरटेल ग्राहक लवकरच ॲपल टीव्ही प्लस ॲपल म्युझिक .” या अविश्वसनीय कंटेन्टचा आनंद घेऊ शकतील, याचा आम्हाला आनंद आहे, असे म्हटले आहे.
किंमत :
सध्या भारतात ॲपल टीव्ही प्लसचे सबस्क्रिप्शन प्रति महिना ९९ रुपयांपासून सुरू होते, तर ॲपल म्युझिक विविध योजना ऑफर करते; ज्यात महिन्याला विद्यार्थ्यांसाठी ५९ रुपये, वैयक्तिक युजर्ससाठी ९९, तर कुटुंबासाठी १४९ रुपये आदी योजनांचा समावेश होतो. तर Airtel ने जाहीर केले आहे की, ॲपल टीव्ही प्लस आणि ॲपल म्युझिक या वर्षाच्या अखेरीस भारतातील एअरटेल ग्राहकांसाठीच उपलब्ध होतील; ज्यामुळे त्यांच्या सबस्क्रिप्शनमध्ये वाढ होईल.