गणपतीला गावी जायचं म्हणजे नुसती धम्माल, तुमचंही तिकीट आतापर्यंत बुक करून झालं असेल ना? वर्क फ्रॉम होमची सोय असल्याने अनेक चाकरमानी आपले लॅपटॉप घेऊन गावची वाट धरायला मोकळे झाले आहेत. पण गावावरून काम करायचं म्हणजे इंटरनेटची मोठी समस्या समोर उभी असतेच. कोकण विदर्भासह अनेक भागात पाऊसही जास्त असल्याने अनेक मोबाईल कंपन्यांचे सिमकार्ड नेटवर्कच्या बाबत थेट दांडी मारतात. अशावेळी गावोगावी साथ देणारं, जोडून ठेवणारी कंपनी म्हणजे बीएसएनएल. अनेक खेड्यांमध्ये जिओ आल्यावरही बीएसएनएलला दुसरी स्पर्धाच नाही. म्हणूनच यंदा गणपतीत तुम्ही नेटवर्कची चिंता न करता आरामात गावी जावं म्हणून बीएसएनएल एक भन्नाट ऑफर घेऊन आले आहे, या ऑफरचे वैशिष्ट्य जाणून घेऊयात.

काय आहे BSNL चा मॅजिक रिचार्ज?

बीएसएनएलने स्वातंत्र्य दिन विशेष ऑफर मध्ये ४९९ व ५९९ चे ब्रॉडबँड रिचार्ज प्लॅन अवघ्या २७५ रुपयात सबस्क्राईब करण्याची संधी मिळणार आहे. हे सब्स्क्रिप्शन ७५ दिवसांसाठी असून यानंतर आपण सेवांचा लाभ घेण्यासाठी नियमित दर मोजावे लागतील. तसेच जर आपण ९९९ रुपयांच्या प्लॅनचे सब्स्क्रिप्शन घेऊ इच्छित असाल तर ऑफर अंतर्गत आपल्याला ७७५ रुपयेच मोजावे लागतील.

‘हा’ Whatsapp Number तुमच्या फोनमध्ये असायलाच हवा; नाहीतर ऐनवेळी होऊ शकते पंचाईत

बीएसएनएल ब्रॉडबँडच्या २७५ रुपयांच्या सब्स्क्रिप्शन मध्ये आपल्याला ३०Mbps स्पीडने ३३०० जीबी डेटा मिळणार आहे. आपले डेटा लिमिट पूर्णपणे वापरल्यास इंटरनेट स्पीड २ MBPS इतका होईल. याचप्रमाणे ५९९ व ९९९ च्या प्लॅन मध्ये आपल्याला अनुक्रमे ६० व १५० MBPS स्पीड मध्ये ३३०० जीबी व २००० जीबी डेटा मिळणार आहे. या सब्स्क्रिप्शन सह आपल्याला डिजनी हॉटस्टार, सोनी लिव्ह व अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मचा सुद्धा लाभ घेता येईल. कंपनीची ही नवी ऑफर नव्या युजर्स साठी आहे.