मोबाईल हातात घेतल्याशिवाय अनेकांची सकाळ होतंच नाही, असं म्हणतात. होय हे खरंय, कारण मोबाईलचा अतिवापरामुळं अनेकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीत मोबाईल हा अविभाज्य घटक बनला आहे. योग्य कामासाठी मोबाईलचा वापर केला तर तो नक्कीच चांगला ठरेल. पण मोबाईचं व्यसन जडल्यास ते तुम्हाला हानिकारक ठरेल. मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळण्यासह सोशल मीडियावर व्हिडीओ पाहण्यात अडकलेल्यांच्या ९-१७ वयोगटातील मुलांचं प्रमाण वाढलं आहे, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सर्वेक्षणातून आली धक्कादायक माहिती समोर

शहरात राहणाऱ्या जवळपास ४० टक्के पालकांनी ९-१७ वयोगटातील मुलांना मोबाईलच्या ऑनलाईन गेमिंग, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागलं असल्याचं मान्य केलं आहे. तर ४९ टक्के पालकांनी ९-१३ वयोगटातील मुलं तीन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मोबाईलवर घालवत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मुलांचं व्हिडीओ पाहण्यात, ऑनलाईन गेमिंगमध्ये अडकून राहण्याचं प्रमाण वाढत असल्याचं एका स्टडीच्या माध्यमातून समोर आलं आहे. तसेच जवळपास ६२ टक्के पालकांनी १३-१७ वयोगटातील मुलं स्मार्टफोनवर तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ सोशल मीडियावर व्हिडीओज पाहण्यात आणि गेम खेळण्यात अडकल्याची माहिती दिली आहे.

नक्की वाचा – नाद करायचा नाय! ‘कुत्ता समझा क्या’, सिंहांच्या कळपासोबत मस्ती करणाऱ्याला अद्दलच घडली, पाहा अंगावर शहारा आणणारा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४४ टक्के पालकांनी मुलं मोबाईलच्या व्यसनात गुंतल्याचं मान्य केलं आहे. तर ५५ टक्के पालक म्हणतात, ९-१३ वयोगटातील मुलं संपूर्ण दिवस मोबाईलच्या आहारी गेलेले असतात. तसेच १३-१७ वयोगटातील मुलंही दिवसभर मोबाईलमध्ये अडकून राहतात, असं ७१ टक्के पालकांचं म्हणणं आहे. कोरोना काळात मुलांना मोबाईलचं अॅक्सेस देणं त्यांच्या व्यसनाला कारणीभूत ठरलं आहे, अशी माहिती पालकांनी सर्वेक्षणात दिली आहे. सोशल मीडियावर प्रोफाईल बनवण्यासाठी वयाची मर्यादा १३ वरून १५ केली पाहिजे, अशी मागणी पालकांनी या सर्वेक्षणाद्वारे केली आहे. लहान मुलांच्या सोशल मीडियावर अकाऊंट बनवण्याच्या वृत्तीला अंकुश घालण्यासाठी सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. भारतातील २८७ जिल्ह्यांतील ६५ हजारांहून अधिक नागरिकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला आहे. यामध्ये ६७ टक्के पुरुषांचा तर ३३ टक्के महिलांचा समावेश आहे.