Twitter Long Video Uploading Feature: आजकाल ओटीटी माध्यमांचा जमाना आहे. लोक वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रिप्शन घेऊन विविध शो, चित्रपट पाहत असतात. पण काही वेळेस किंमत जास्त असल्याने लोक सब्सक्रिप्शन घेणे टाळतात. ओटीटी सब्सक्रिप्शन खरेदी करणे शक्य होत नसलेल्या लोकांसाठी आणखी एक नवा पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरवर चित्रपट, शोज पाहता येणार आहेत. हे ऐकून ट्विटरन कोणत्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्मशी भागीदारी केली आहे असे काहीजणांना वाटत असेल. पण मस्क यांनी ट्विटरलाच ओटीटी प्लॅटफॉर्म बनवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या फीचरमुळे यूजर्स २ तास किंवा ८ जीबी क्षमता असलेले व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करु शकणार आहेत. ही सुविधा फक्त ट्विटर ब्लू यूजर्सना उपभोगता येणार आहे. ट्विटर हे सुरुवातीपासून मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. या नव्या फीचरमुळे ट्विटरला ओटीटी प्लॅटफॉर्मचे स्वरुप येणार आहे. ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन असलेल्या यूजर्सनी या नव्या फीचरचा वापर करायला सुरुवात केली आहे. बऱ्याच यूजर्सनी अपडेटच्या मदतीने त्यांचे आवडते चित्रपट अपलोड केले आहेत.

काहीजणांनी तर एलॉन मस्क यांच्या ट्वीटच्या खालीच चित्रपटाचे व्हिडीओ अपलोड केल्याचे पाहायला मिळते. सर्व यूजर्ससाठी ट्विटर हे माध्यम अधिक खुले असावे यासाठी एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये नवे फीचर लॉन्च केले आहे. जास्त लांबीचे व्हिडीओ अपलोड करण्याच्या क्षमतेमुळे ट्विटरच्या यूजर्समध्ये वाढ होईल अशी मस्क यांना आशा आहे.

आणखी वाचा – Instagram नव्या अ‍ॅपसह Twitter देणार टक्कर; मेटाच्या Text-Based अ‍ॅपचा लूक झाला लीक, पाहा व्हायरल फोटो

यूजर्स का म्हणत आहेत R.I.P. Youtube?

सध्या यूट्यूबवर मोफत चित्रपट पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. ट्विटरच्या या नव्या अपडेटमुळे यूट्यूबसमोर आव्हान निर्माण होणार आहे असे लोक म्हणत आहेत. या फीचरमुळे यूट्यूब वापरणारे लोक ट्विटरकडे वळतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भामध्ये लोक असंख्य ट्वीटस पोस्ट करत आहेत. काही यूजर्सनी एकूण प्रकरणावरुन R.I.P. Youtube अशी कमेंट्स केल्या आहेत. ट्विटरच्या नव्या अपडेटचा प्रभाव अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मवर पडू शकतो असाही अंदाज लावला जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk announced uploading long videos feature in twitter watch user reactions yps
First published on: 21-05-2023 at 13:21 IST