scorecardresearch

Crush असो किंवा EX, कोणाचंही व्हॉट्सऍप स्टेट्स गुपचूप पाहता येणार; सेटिंगमध्ये फक्त ‘हे’ बदला

एखाद्याने नुकतंच व्हाट्सऍपला स्टेटस टाकलं आणि चुकून तुम्ही एका सेकंदाच्या आत त्यावर क्लिक केलं अशा परिस्थितीत कारण नसतानाही उगाच संकोच वाटतो, हो की नाही?

Crush असो किंवा EX, कोणाचंही व्हॉट्सऍप स्टेट्स गुपचूप पाहता येणार; सेटिंगमध्ये फक्त ‘हे’ बदला
Whatsapp status गपचूप पाहता येणार (फोटो: प्रातिनिधिक/Pixabay)

एखाद्याने नुकतंच व्हाट्सऍपला स्टेटस टाकलं आणि चुकून तुम्ही एका सेकंदाच्या आत त्यावर क्लिक केलं अशा परिस्थितीत कारण नसतानाही उगाच संकोच वाटतो, हो की नाही? आणि चुकून जर का ही स्टेट्स टाकणारी व्यक्ती तुमचा एक्स, भांडण झालेली एखादी मैत्रीण असेल तर मग सांगायलाच नको. पण आता या प्रश्नावर व्हाट्सऍपनेच एक कमाल उत्तर शोधून काढलं आहे. यापुढे काही सोप्या ट्रिक वापरून आपण कोणालाही न कळता आपल्याला हव्या त्या व्यक्तीचं स्टेट्स पाहू शकाल. यासाठी काय करायचं हे स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात..

समोरच्या व्यक्तीला कळू न देता त्याचे व्हाट्सऍप स्टेटस पाहण्यासाठी..

ट्रिक १:

  • व्हाट्सऍप सुरु करा, स्क्रीनच्या उजव्या बाजूला वर तीन डॉट्स दिसतील त्यावर क्लिक करून ड्रॉप डाऊन मेन्यू दिसेल. यामध्ये सेटिंग वर क्लिक करा .
  • सेटिंग मध्ये ‘Account -> Privacy’ वर जा
  • प्रायवसी मध्ये ‘Read receipts’ वर टॅप करून त्याला डिसेबल (बंद) करा

यापद्धतीने आपण कोणालाही न कळता इतरांचे व्हाट्सऍप स्टेटस पाहू शकता. या व्यक्तीला तुम्ही स्टेटस पाहिलेल्यांच्या यादीत दिसणार नाही. यामध्ये समस्या इतकीच आहे की रीड रिसिप्ट बंद केल्यावर तुम्हाला सुद्धा इतरांनी तुमचे स्टेट्स पाहिलेले दिसणार नाही.

..नाहीतर पूर्ण दिवस मोफत देऊ हाय- स्पीड इंटरनेट! तुमची Router कंपनी देतेय का ‘ही’ सेवा?

ट्रिक २

  • तुमच्या स्मार्टफोन वर फाईल मॅनेजर ऍप इन्स्टॉल करा.
  • फाईल मॅनेजर मधील स्टोरेज पर्यायावर जा
  • यात व्हाट्सऍप फोल्डर मधील मीडिया पर्याय निवडा.
  • इथे तीन डॉट्स दिसतील त्यातील सेटिंग वर क्लिक करा, इथे आपल्याला शो हिडन फाईल्स असा पर्याय दिसेल त्याला सुरु करा.
  • यानंतर आपल्याला व्हाट्सऍप फोल्डर मध्ये ‘Statuses’ हा नवा फोल्डर तयार झालेला दिसेल, इथे आपण प्री-लोडेड व्हाट्सऍप स्टेटस पाहू शकाल.

गणपतीला गावी जाऊन इंटरनेटची चिंता नको; ‘ही’ कंपनी देतेय 275 रुपयात 3300GB डेटा

मेटा सीईओ, मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच केलेल्या घोषणेनुसार, व्हॉट्सअ‍ॅप सध्या वापरकर्त्यांसाठी नवे गोपनीयता फीचर्स सादर करणार आहे. तुमच्या मॅसेजचे स्क्रिनशॉट काढण्यापासून ते तुमचे स्टेटस ऑनलाईन दिसेपर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला यामार्गे नियंत्रणात ठेवता येणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या