Meta: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर महिलांसाठी खास टूल; अनुमतीशिवाय गोपनीय फोटो शेअर केल्यास होणार कारवाई

ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे.

meta-facebook-brand-jokes
Meta: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर महिलांसाठी खास टूल; अनुमतीशिवाय गोपनीय फोटो शेअर केल्यास होणार कारवाई (Photo- Indian Express)

ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे. या टूलद्वारे महिला आपली ओळख जाहीर न करता ट्रोल करणाऱ्यांची तक्रार करू शकतात. परवानगीशिवाय लैंगिक फोटो शेअर केला असल्यास फ्लॅग रेज करू शकतात. त्यानंतर फोटो आपोआप काढून टाकला जाईल. ज्या महिलांना इंग्रजी येत नाही त्यांनाही त्यांच्या स्थानिक भाषेत तक्रार करता येणार आहे. महिला फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषेत तक्रार करू शकतील. आता १२ भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्‍ध आहे.

मेटा प्लॅटफॉर्मच्या संचालक (ग्लोबल सिक्युरिटी पॉलिसी) करुणा नैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेटाच्या या उपक्रमामुळे महिलांना भाषेच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. “तक्रार केल्यावर हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांकडून त्यांचा फोटो घेत नाही. मात्र एका युनिक आयडीद्वारे विवादित पोस्टवर कारवाई केली जाते. फोटो अपलोड होताच फेसबुकचे ऑटोमॅटिक टूल्स ते स्कॅन करतात. मेटाने सेंटर फॉर रिसर्च (CSR) आणि रेड डॉट फाऊंडेशन सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिलांना सुरक्षा दिली जाईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.

ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही; कारण…

कंपनीने स्टॉप एनसीआयआय डॉट ओआरजी (StopNCII.org) नावाचा एक प्लॅटफॉर्म देखील सुरू केला आहे. ज्याचा उद्देश गैर-सहमतीच्या गोपनीय फोटोंचा प्रसार थांबवणे देखील आहे. मेटाच्या मते, भारतातील केवळ ३३ टक्के महिला सोशल मीडियाचा वापर करतात, तर पुरुषांची संख्या ६७ टक्के आहे. महिला सोशल मीडियावर न येण्यामागे सुरक्षितता हे सर्वात मोठे कारण आहे. त्यांच्या फोटोंचा गैरवापर होण्याची भीती नेहमीच असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meta has announced three initiatives to help protect women in india rmt

ताज्या बातम्या