scorecardresearch

Solar Energy : आता रात्रीही सौरऊर्जेपासून वीज तयार करता येणार! ‘या’ नवीन तंत्रज्ञानाने उर्जाक्षेत्रात क्रांती येणार

सौर ऊर्जेचा पर्याय निश्चितच सोयीचा ठरतो. यात अडचण अशी आहे की ती साठवून ठेवता येत नसल्याने रात्री काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होतो. पण आता यावरही तज्ज्ञांनी उत्तर शोधून काढलंय.

solar-panel
(File Photo)

महिन्याला हजारो रुपयांवर येणाऱ्या वीजबिलाचा वर्षभराचा आकडा खूप मोठा होतो. मिळणाऱ्या उत्पन्नातून हा खर्च भागवताना सामान्य नागरिक त्रस्त होऊन जातात. या खर्चातून मुक्त होण्यासाठी सौर ऊर्जेचा पर्याय निश्चितच सोयीचा ठरतो. यात अडचण अशी आहे की ती साठवून ठेवता येत नसल्याने रात्री काय करायचं? हा प्रश्न उपस्थित होतो. पण आता यावरही तज्ज्ञांनी उत्तर शोधून काढलंय. ऑस्ट्रेलियामधील इंजिनीअर्सच्या टीमने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यामुळे आता रात्रीही सौरउर्जेपासून वीज तयार करून वापरता येऊ शकते.

हे वाचून सुरूवातीला तुम्हाला विचित्र वाटेल, पण हे खरंय. असे अनेक पदार्थ आहेत ज्यात पारंपरिक सोलर पॅनलच्या उलट प्रक्रियेने वीज निर्माण करता येते. यामध्ये रात्रीच्या वेळी सामग्रीमधून उष्णता बाहेर पडली की वीज निर्माण होते. ऑस्ट्रेलियातील इंजिनीअर्सच्या टीमने हे तत्त्व अंमलात आणून दाखवून दिले आहे.

हे तंत्र सामान्यतः रात्रीच्या काळोखात दिसण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गॉगलमध्ये सुद्धा वापरले जाते. आतापर्यंत या नवीन तंत्रज्ञानाच्या प्रोटोटाइपने फारच कमी ऊर्जा निर्माण केली आहे आणि लवकरच पर्यायी ऊर्जा स्त्रोत म्हणून विकसित होण्यास वेळ लागू शकतो, परंतु जर हे तंत्रज्ञान सध्याच्या फोटोव्होल्टेईक्स तंत्रज्ञानाशी जोडले गेले तर ते दिवसभरात गरम राहिलेला सोलार पॅनल रात्रीच्या वेळी थंड पडल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करू शकतो.

ही यंत्रणा कशी काम करते ?
फोटोव्होल्टेइक प्रक्रियेत सूर्यप्रकाश कृत्रिमरित्या थेट विजेमध्ये रूपांतरित केला जातो. सौर ऊर्जा वापरण्याचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. या अर्थाने, थर्मोरेडिएटिव्ह प्रक्रिया देखील अशाच प्रकारे कार्य करते, ज्यामध्ये इन्फ्रारेड लहरींद्वारे अवकाशात जाणारी उष्णता ऊर्जा वापरली जाते. जेव्हा कोणत्याही पदार्थातील अणूमधून उष्णता वाहते तेव्हा इलेक्ट्रॉन इन्फ्रारेड लहरींच्या स्वरूपात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करू लागतात. या प्रक्रियेतून अत्यंत कमी क्षमतेने संथ वीजनिर्मिती करता येते.

आणखी वाचा : Redmi Note 11T Pro+ आणि Redmi Note 11T Pro स्मार्टफोन २४ मे रोजी होतोय लॉंच, जाणून घ्या

विशेष डायोडची भूमिका
या प्रक्रियेतून अत्यंत कमी क्षमतेने संथ वीजनिर्मिती करता येते. यासाठी इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह एका दिशेने असणारे उपकरण आवश्यक आहे, ज्याला डायोड म्हणतात. यामध्ये, उष्णता गमावल्यावर इलेक्ट्रॉन खाली जमा होतात. संशोधकांनी मरकरी कॅडमियम टेल्युराइड (एमसीटी) पासून बनवलेल्या डायोडचा वापर केला, जो इन्फ्रारेड प्रकाश पकडण्यासाठी वापरला जातो. ऊर्जास्रोत म्हणून त्याचा प्रभावीपणे कसा वापर करता येईल हे आतापर्यंत माहीत नव्हते.

एमसीटी फोटोव्होल्टेइक डिटेक्टरने २० अंश उष्णतेपर्यंत प्रति चौरस मीटर २.२६ मिलीवॅट घनतेची ऊर्जा उत्सर्जित केली. त्यामुळे कॉफीसाठी पाणीही उकळता येत नाही. सध्याचे थर्मोरेडिएटिव्ह डायोड खूप कमी ऊर्जा देत आहेत. परंतु हे तंत्रज्ञान भविष्यात अधिक कार्यक्षम बनवता येईल. पण या तंत्रज्ञानाचा शोध घेणे हे खरे आव्हान होते.

सध्या कमी उर्जेच्या रेडिएशनचा स्त्रोत म्हणून ग्रहाच्या थंड प्रक्रियेचा वापर करण्यासाठी काम चालू आहे, त्यापैकी एक या अभ्यासात केला गेला. या तंत्रज्ञानाची क्षमता वाढवल्याने बॅटरी बदलण्याची किंवा काढून टाकण्याची गरज दूर होऊ शकते. अशा तंत्रज्ञानाची केवळ ही एक सुरुवात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: New solar cell can generate electricity even at night know how prp

ताज्या बातम्या