scorecardresearch

iPhone 13 च्या अर्ध्या किमतीत मिळणार Nothing Phone 1; जाणून घ्या तपशील

लॉंच होण्यापूर्वी नथिंग फोन १चे अनेक तपशील समोर आले आहेत. विशेष म्हणजे त्याची किंमत आयफोनच्या तुलनेत खूपच कमी असणार आहे.

Nothing Phone 1 details leaked
१२ जुलै रोजी नथिंग फोन १ भारतासह इतर अनेक बाजारपेठांमध्ये लॉंच होणार आहे. (Photo : Twitter)

नथिंग फोन १ (Nothing Phone 1) लवकरच भारतात लॉंच होणार आहे. कंपनी १२ जुलै रोजी भारतासह इतर अनेक बाजारपेठांमध्ये लॉंच करणार आहे. लॉंच होण्यापूर्वी या स्मार्टफोनचे अनेक तपशील समोर आले आहेत. ताज्या अहवालात त्याची किंमत लीक झाली आहे. कंपनी हा फोन परवडणाऱ्या किमतीत लॉंच करणार आहे. विशेष म्हणजे त्याची किंमत आयफोनच्या तुलनेत खूपच कमी असणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी, कंपनीचे संस्थापक कार्ल पेई यांनी त्यांच्या अधिकृत सादरीकरणात सांगितले होते की त्यांचा पहिला अँड्रॉइड फोन आयफोनशी स्पर्धा करेल. आगामी नथिंग फोन १ मध्ये, वापरकर्त्यांना अँड्रॉइड १२ वर आधारित रिफ्रेश केलेले डिझाइन आणि नथिंग ओएस मिळेल.

नथिंग फोन १ची किंमत किती असणार?

रूट माय गॅलेक्सी (Rootmygalaxy) च्या अहवालानुसार, स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येईल. फोनच्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच ८जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजची किंमत ३९७ डॉलर म्हणजेच सुमारे ३१ हजार रुपये असेल. त्याच वेळी, ८जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेज वेरिएंट सुमारे ४१९ डॉलर म्हणजेच सुमारे ३२ हजार रुपये असेल. टॉप वेरिएंट १२ जीबी रॅम + २५६जीबी स्टोरेजची किंमत ४५६ डॉलर म्हणजेच सुमारे ३६ हजार रुपये असेल.

हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी+ प्रोसेसरसह येईल. त्यामुळे त्याची किंमत ३० हजार रुपयांच्या बजेटमध्ये असू शकते. या चिपसेटसह येणाऱ्या दुसऱ्या स्मार्टफोनची किंमतही जवळपास ३० हजार रुपये आहे.

दुसरीकडे, आयफोनची नवीनतम आवृत्ती म्हणजेच आयफोन १३ (iPhone 13) यापेक्षा खूप जास्त किंमतीत येते. त्याची किंमत ७१,९९० रुपयांपासून सुरू होते. नथिंग फोन १ ची ही किंमत लीक झालेल्या माहितीवर आधारित आहे. किंमतीची अधिकृत माहिती १२ जुलै रोजी उपलब्ध होईल. स्मार्टफोनचे बरेच तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. पण त्याच्या काही वैशिष्ट्यांची पुष्टी झाली आहे.

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७७८जी+ प्रोसेसर उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह येईल. फोनमध्ये एलईडी लाईट्सचाही भरपूर वापर करण्यात आला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. समोर एक पंच होल डिस्प्ले असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-07-2022 at 13:41 IST