मागील काही वर्षांमध्ये AIने सर्वांनाच वेड लावले आहे. AI च्या अनेक आगळ्यावेगळ्या टूल्सने लोक भारावून गेले आहेत. सध्या AI चा चॅटबॉट ChatGPT ची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.तुम्हीही ChatGPTविषयी वाचले असावे पण आज आम्ही तुम्हाला ChatGPTचा वापर करून आपण काय काय करू शकतो, याविषयी माहिती सांगणार आहोत. १. तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी रेझ्युम आणि कव्हर लेटर तयार करायचे असेल तर ChatGPTद्वारे तुम्ही हे काम उत्तमपणे करू शकता. २. जोक्स तयार करणे…जर आपण ChatGPT जोक्स सांगण्यास विचारले तर तुम्हाला ChatGPT एकापेक्षा एक हटके जोक्स सांगू शकतो. हेही वाचा : एलॉन मस्कनं मागितली ट्विटर युजर्सची माफी; म्हणाला, “सॉरी, ट्विटर मोबाईल अॅप…” ३. अनेकदा काही विषय आपल्याला समजत नाही त्या वेळी आपण गूगलचा वापर करतो पण अनेकदा गूगलवरही आपल्याला हवी ती माहिती मिळत नाही. अशा वेळी ChatGPT कठीण विषयही सविस्तरपणे तुम्हाला समजावून सांगू शकतो. ४. जर एखाद्या शाळकरी मुलाला गणिताचा एखादा प्रश्न समजला नाही अशा वेळी ChatGPT त्यांना स्टेप बाय स्टेप प्रश्नाचे उत्तर समजावून सांगू शकतो. ५. ChatGPT ही एक AI सिस्टीम आहे. मानवी भावनांचा याच्याशी काहीही संबंध नाही तरीसुद्धा ChatGPT तुम्हाला रिलेशनशिप टिप्स सांगू शकतात. ६. ChatGPT हा रोबोटिक टूल नसून क्रिएटिव्ह टूल आहे. जर तुम्ही एखाद्या विषयावर गाणे किंवा रॅप बनवायला सांगितले तर ChatGPT हे सुद्धा करू शकतो. ७. ChatGPT कोड क्रिएट करू शकतो. एवढेच काय तर त्यातील चुकासुद्धा शोधून काढतो. हेही वाचा : व्हॉट्सअॅपमधील खासगी चॅट्स Hide करायचे आहेत? तर मग वापरा ‘हे’ २ Features ८. अनेकदा आपण भाषांतरासाठी गूगल ट्रान्सलेटचा वापर करतो पण ट्रान्सलेट करताना अनेकदा वाक्यांचा अर्थ बदलतो पण ChatGPTच्या मदतीने तुम्ही अनेक भाषांमध्ये कंटेट तयार करू शकता. ९. जॉब मुलाखतीसाठी स्वत:ला तयार कसे करायचे, हा प्रश्न अनेकांना पडतो पण ChatGPT कडे या प्रश्नाचेही उत्तर आहे. ChatGPT तुम्हाला जॉब मुलाखतीसाठी तयार करतो. तुम्हाला मार्गदर्शन करतो. हेही वाचा : Vivo ने लॉन्च केला ‘हा’ तगडा स्मार्टफोन,५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ४४W च्या चार्जिंग सपोर्टसह मिळणार… १०. जर तुम्हाला एखाद्या विषयावर निबंध लिहायचा असेल तर ChatGPT कोणत्याही विषयांवर निबंध लिहू शकतो. ११. ChatGPT हा AI चा एक चॅटबॉट आहे. ChatGPT सोबत तुम्ही कोणत्याही विषयावर चॅट करू शकता. कोणत्याही विषयावर प्रश्न विचारू शकता. चर्चा करू शकता. (टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)