iPhone 14 Unboxing Viral Video: नवीन स्मार्टफोन खरेदी करताना, स्टोरेज, कॅमेरा, स्क्रीनसह टिकाऊपणा हा एक प्रमुख घटक असतो. विशेषत: जर फोनची किंमत लाखोंमध्ये असेल तर त्याला खरचटलं तरी जीवाचं पाणी पाणी होतं. चुकून पाण्यात वगैरे फोन पडला तर त्यानंतर होणारी घालमेल शब्दात सांगताच येणार नाही. पण सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर iPhone 14 चे अनावरणच पाण्यात करत असल्याचे दिसत आहे. ऐकूनच धक्का बसला ना? जवळपास लाखाच्या घरात असणारा iPhone १४ हा ७ सप्टेंबरला लाँच करण्यात आला. अनेकांनी याचे अनावरण करून रिव्ह्यूज पोस्ट केले आहेत मात्र हा व्हायरल व्हिडीओ सर्वांच्या हृदयाची धडधड वाढवत आहे.

@nilojeda या इंस्टाग्रामरने शेअर केलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहू शकता की तो फोनचा बॉक्स हातात घेऊन उभा आहे आणि तितक्यात तो मागे उडी मारतो व स्विमिंग पूल मध्ये पडतो. स्विमिंगपूलमध्येच तो फोनचा बॉक्स उघडून चार्जर व फोन दाखवतो. तीन कॅमेरा व काळा रंग असलेला iPhone 14 त्याने अनावरण करून दाखवला आहे. या व्हिडिओला तब्बल १० लाखाहून अधिक लाईक्स आहेत. या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे iPhone 14 खरोखर वॉटरप्रूफ आहे का पाहुयात..

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

iPhone 14 वॉटरप्रूफ आहे का?

iPhone 14 Pro आणि 14 Pro Max ला IP68 रेट केले गेले आहे, याचा अर्थ ते बेस iPhone 14 आणि 14 Plus प्रमाणेच जास्तीत जास्त 19 फूट खोलीवर 30 मिनिटांसाठी धूळ आणि पाण्यात चालू शकतात. IP68 हे बर्‍याच आघाडीच्या स्मार्टफोन उत्पादकांतर्फे गुणवत्तेचे मानक मानले जाते. Apple उपकरणांना iPhone 11 पासून IP68 रेट केले गेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या डिस्प्लेमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रॅक असल्यास पाणी व धूळ याचा सामना फोन करू शकेल याची शाश्वती नाही.

iPhone 14 चे स्विमिंगपूल मध्ये अनावरण

दरम्यान फोन घेताना अनेकदा वॉटरप्रूफच्या नावे वॉटर रेसिस्टंट म्हणजेच सोप्या शब्दात घाम किंवा अगदी किमान पाण्यात तग धरू शकणारे फोन विकले जातात. म्ह्णूनच वॉटर प्रूफ फोन घ्यायचा असल्यास त्याचा आयपी तपासून घ्यावा.