बरेचवेळा व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत असताना, ते चॅट्स कोणी पाहू नयेत असे प्रत्येक युजरला वाटत असते. तसेच आपले चॅट्स सुरक्षित राहावेत अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी सतत नवीन नवीन फीचर्स लॉंच करत असते. हे फीचर्स अतिशय जबरदस्त असतात. नव्या फीचर्समुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला व्हावा असा कंपनीचा प्रयत्न असतो.

व्हॉट्सअ‍ॅपने आजवर अनेक नवे फीचर्स लॉंच केले आहेत. यामध्ये व्हिडीओ कॉलिंग, मेसेज डिलीट करणे, इत्यादी फीचर्सचा समावेश आहे. असेच एक फीचर म्हणजे व्ह्यू वन्स फीचर. या फीचरच्या मदतीने युजर्स कोणताही फोटो किंवा व्हिडीओ समोरच्याला फक्त एकदाच पाहण्याची परवानगी देऊ शकतात. यामुळे समोरच्याने हे फोटो किंवा व्हिडीओ एकदा पाहिले की ते त्यांना पुन्हा पाहता येत नाही.

हे फीचर लॉंच झाल्यानंतर युजर्स खूपच खुश झाले होते. मात्र यामध्ये एक त्रुटी आहे आणि ती म्हणजे समोरची व्यक्ती व्ह्यू वन्समध्ये पाठवलेल्या फोटोचा स्क्रीनशॉट काढू शकतो. यामुळे असे फोटो फक्त एकदाच पाहण्यासाठी पाठवले असतील तरीही समोरचा व्यक्ती त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याला हवं तेव्हा हे फोटो पुन्हा पाहू शकतो. मात्र आता याला प्रतिबंध करता येणं शक्य आहे. कसं ते जाणून घेऊया.

Viral : पत्नीच्या सांगण्यावरून किराणा भरायला गेला पण एका झटक्यात बनला करोडपती; पाहा नेमकं काय झालं

व्ह्यू वन्स फीचरचा उद्देश युजर्सना गोपनीयता प्रदान करणे असा असला तरीही समोरच्या व्यक्तीने संबंधित फोटोचा स्क्रीनशॉट काढला तर ही गोपनीयता भंग पावते. मात्र यापुढे मेसेज प्राप्त करणाऱ्याला व्ह्यू वन्स मेसेजचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही. समोरच्या व्यक्तीने संबंधित मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ब्लँक स्क्रीन पाहायला मिळेल. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच हे नवं फीचर लॉंच करणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अद्याप हे फीचर लॉंच झालेले नसल्यामुळे मेसेज प्राप्तकर्ता अजूनही अशा मेसेजचा स्क्रीनशॉट काढण्यास सक्षम आहे. त्यामुळे असे मेसेज पाठवताना युजर्सनी सतर्क राहावे.