scorecardresearch

iPhone 12 वर मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या तुम्ही किती रुपयांना खरेदी करू शकता

तुम्हीही आयफोन घेण्याचे ठरवले असेल किंवा तो खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. iPhone 12 वर उपलब्ध असलेली सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर तुमच्या उपयोगाची ठरणार आहे.

iPhone-12-Offers-
(फोटो- Apple)

तुम्हीही आयफोन घेण्याचे ठरवले असेल किंवा तो खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे. iPhone 12 वर उपलब्ध असलेली सर्वात मोठी डिस्काउंट ऑफर तुमच्या उपयोगाची ठरणार आहे. भारतातील iPhone 12 च्या किमतीत ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सद्वारे सूट दिली जात आहे. पण, आयफोन 13 सध्या बाजारात उपलब्ध आहे.

iPhone 12 सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह येतो आणि Apple ची A14 बायोनिक चिप मिळते. यात ड्युअल रियर कॅमेरे देखील आहेत आणि नवीन iOS रिलीझ – iOS 15 शी संबंधित आहे. iPhone 12 – iPhone 13 प्रमाणेच – 5G कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

आणखी वाचा : आता Whatsapp वर फोन नंबर सेव्ह न करता चॅट करता येणार, वाचा सविस्तर

आयफोन 12 कुठे खरेदी करायचा?
Apple चे डिव्हाईस आणि iPhones भारतात IndiaiStore वर विकले जातात. सध्या आयफोन 12 यावर ३८,९०० रुपयांना विकला जात आहे. यामध्ये ५००० रुपयांची इन्स्टंट स्टोअर डिस्काउंट ऑफर आणि iPhone बदलल्यावर एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. ही किंमत ६४ GB मॉडेलवर लागू होते.

Apple अधिकृतपणे iPhone 12 ची सुरुवातीच्या किंमतीला ६५,९०० रुपयांना विकत आहे. त्यामुळे, IndiaiStore.com साइटवर उपलब्ध सवलत रु.२७,००० पर्यंत दिली जात आहे. ज्यावर तुम्ही हा फोन ३८,९०० रुपयांना खरेदी करू शकता.

आणखी वाचा : Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea चे ३० आणि ३१ दिवसांचे प्लान, जाणून घ्या कोणते स्वस्त आणि फायदेशीर

ऑफलाइनवर किती डिस्काउंट?
ऑफलाइन रिटेल कंपनी विजय सेल्स 64 GB मॉडेलसाठी 58,990 रुपयांच्या सवलतीच्या दरात iPhone 12 विकत आहे. एचडीएफसी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, एचएसबीसी, फेडरल बँक, आरबीएल, इंडसलॅंड बँक किंवा एयू स्मॉल फायनान्स बँक कार्ड वापरून ग्राहक ७.५ टक्क्यांपर्यंत झटपट सूट घेऊ शकतात. याशिवाय iPhone 12 वर एक्सचेंज ऑफर देखील आहे.

रिलायन्स डिजिटल ६४ GB मॉडेलसाठी iPhone 12 हा ५५,९९० रुपयांना विकत आहे. हे HDFC बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना ७.५ टक्क्यांपर्यंत झटपट सूट देखील देत आहे.

याशिवाय, अॅमेझॉन ५३,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह iPhone 12 देखील विकत आहे. सिटीबँक किंवा बँक ऑफ बडोदा कार्ड वापरून ग्राहक अतिरिक्त १० टक्के झटपट सवलत (रु. १५०० पर्यंत) मिळवू शकतात. ई-कॉमर्स साइट १३,३०० रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Where are the discounts available on iphone 12 know how much you can buy for prp

ताज्या बातम्या