Youtube Subscriber Limit: सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. प्रत्येक जण सोशल मीडियाचा वाप[आर करत असतो. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून आपल्याला पैसे देखील कमवता येतात. यामध्ये You Tube हे असे एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ , शॉर्ट्स अपलोड करू शकतो. तिथे अनेक चॅनेल्स आपल्याला पाहायला मिळतात. काहींचे सबस्क्रायबर्स मोठ्या प्रमाणात असतात तर नवीनच सुरूवात असलेले अधिक सबस्क्रायबर्स नसतात. मात्र आता कमी सब्सक्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्ससाठी आनंदाची बातमी आहे.

युट्युबने आपल्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे कमी सबस्क्रायबर्स किंवा कमी फॉलोअर्स असणाऱ्या चॅनेल्सना फायदा होणार आहे. लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube ने जाहीर केले आहे की आता ५०० सबस्क्रायबर्स असणारे सदस्य देखील आता पैसे कमवण्यासाठी पात्र असणार आहेत. कारण युट्युबने १००० सबस्क्रायबर्स असण्याची मर्यादा ५०० इतकी केली आहे. युट्युबने पैसे कमवण्यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेमध्ये बदल केला आहे आणि लहान क्रिएस्टर्सना म्हणजेच ज्यांचे सबस्क्रायबर्स जास्त नसतील अशा चॅनेल्सला प्लॅटफॉर्मवर टिकून राहण्यासाठी व पैसे कमवण्याची संधी मिळावी यासाठी प्लॅटफॉर्मने आपल्या धोरणांमध्ये बदल केला आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा : १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि बायपास चार्जिंगच्या फीचरसह लॉन्च झाला ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी

तसेच युट्युबने पाहण्याचे तास (Watch Hour) मध्ये देखील बदल केले आहेत. त्याची मर्यादा ४००० तासांवरून ३००० तासांवर करण्यात आली आहे. म्हणजेच क्रिएटर्सना वर्षभरामध्ये ४ हजार ऐवजी ३००० Watch Hour पूर्ण करायचे आहे. तसेच युट्युबने जे चॅनेल्स शॉर्ट्स अपलोड करतात त्यांच्यासाठी देखील एक महत्वाचा बदल केला आहे. आता शॉर्ट्सच्या व्ह्यू (View) संध्या आता १० मिलियनवरून ३ मिलियन इतकी करण्यात आली आहे. यामुळे नवख्या किंवा कमी फॉलोवर्स असणाऱ्या क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी प्राप्त होणार आहे.

युट्युबने नियमांमध्ये / धोरणामध्ये केलेले बदल सध्या अमेरिका, इंग्लंड, तैवान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये लागू होणार आहेत. लवकरच ते इतर देशांमध्ये देखील लागू केले जातील. यूट्यूबच्या नवीन नियमांमुळे लहान आणि नवख्या युट्युबर्सना याचा फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या कंटेंटवर पैसे कमवण्याची संधी प्राप्त होणार आहे.

तथापि यूट्यूबर्सना त्यांचे फॉलोवर्स वाढवण्यासाठी आणि जाहिरातींचे पैसे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. रेव्हेन्यू शेअरिंगमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Story img Loader