News Flash

बीएसएनएल-पेण्टा टॅब्लेट कॉलिंग

सध्या दिवसाला एक या प्रमाणे टॅब्लेटस् भारतीय बाजारपेठेत येऊन दाखल होत आहेत. या वर्षांच्या सुरुवातीस निश्चितच कल्पना होती की, हे वर्ष टॅब्लेटस्चे असणार आहे. पण

| January 11, 2013 03:13 am

सध्या दिवसाला एक या प्रमाणे टॅब्लेटस् भारतीय बाजारपेठेत येऊन दाखल होत आहेत. या वर्षांच्या सुरुवातीस निश्चितच कल्पना होती की, हे वर्ष टॅब्लेटस्चे असणार आहे. पण अद्याप जानेवारीचा पहिला पंधरवडाही संपलेला नाही आणि गेल्या १० दिवसांत सुमारे १५ टॅब्लेटस् भारतीय बाजारपेठेत दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या खरेदीमध्येही आता टॅब्लेटस्कडे लोकांचा ओढा असणार हे पुरते स्पष्ट झाले होते. पण तरीही त्याचे प्रमाण एवढे असेल, याची कल्पना अनेकांनी केलेली नव्हती. नववर्षांत तर टॅब्लेटस्चा पाऊसच सुरू झाल्यासारखी अवस्था आहे.

८ इंची टॅब्लेट
टॅब्लेटस्च्या या भाऊगर्दीत आता बीएसएनएल- पेन्टा टी पॅड- डब्लूएस८०२सी बाजारपेठेत दाखल झाला आहे. सुरुवात झाली ती १० इंची टॅब्लेटस्ने. मात्र त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी नवा ट्रेंड सुरू झाला तो ७ इंची टॅब्लेटस्चा. आता बीएसएनएल – पेन्टाने आणलेला हा टॅब्लेट बरोबर यामधे बसणारा म्हणजेच ८ इंची आहे. अलीकडे आलेले बरेचसे टॅब्लेट हे ८ इंची आहेत. त्यामुळे कमी किंमतीचे आणि अधिक किंमतीचे याच्या बरोबर मध्ये आता एक नवा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.

अधिक वजन
हाती घेतल्या घेतल्या या टॅब्लेटचे लक्षात येणारे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याचे वजन. इतर टॅब्लेटस्पेक्षा या टॅबचे वजन जरा अधिकच आहे. टॅब्लेटस्च्या बाबतीत अनेकांना सवय असते ती तो हाती घेऊन प्रवासातही काम करण्याची. पण हा टॅब्लेट त्याच्या अधिकच्या वजनामुळे हाती किती काळ धरता येईल याबद्दल थोडी शंका आहे. कारण बराच काळ एकहाती पकडून राहिल्यानंतर त्याचा दाब मनगटावर येऊ लागतो. त्यामुळे तुम्ही एका जागी बसून असाल तर काहीच हरकत नाही. पण प्रवासात मात्र तो किती वापरण्यायोग्य आहे, ते प्रत्येकाला स्वतच्या अनुभवावरूनच ठरवावे लागेल.

आडवी रचना
हा टॅब्लेट आडवाच पकडावा, अशात पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे तो आपल्या दिशेने तोंड करून पकडल्यानंतर टॅब्लेटच्या उजवीकडच्या बाजूस बटने दिसतात. त्यात सर्च, मागे जाण्यासाठी, होम आणि मेल अशी चार बटनांची सुविधा देण्यातआ ली आहे. या सर्व बटनांच्या वरच्या बाजूस फ्रंट कॅमेरा आहे, ज्याचा वापर व्हिडिओ कॉलिंगसाठी करता येऊ शकतो. त्या सर्व बटनांच्या खालच्या बाजूस मायक्रोफोन देण्यात आला आहे.

मागच्या बाजूस कॅमेरा नाही !
या टॅब्लेटचे एक सर्वात मोठे वैगुण्य म्हणजे त्याला मागच्या बाजूस कॅमेऱ्याची सोय देण्यात आलेली नाही. शिवाय हा पुढच्या बाजूस असलेला कॅमेराही तेवढा प्रभावी वाटत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीस दिसणारी प्रतिमा कितपत सुस्पष्ट असेल याविषयी साशंकताच आहे.

कमी प्रकाशात अडचण
कमी प्रकाशात त्याची अडचण जाणवते. तुम्ही बाहेर असाल तर दिवसाउजेडी स्काइपवरची प्रतिमा चांगली भासू शकते. पण आपण केवळ दिवसाउजेडीच त्याचा वापर करणार नाही तर तो गरजेनुस सार असेल, त्यामुळे ही बाब अडचणीची ठरेल, असे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले.

विविध स्लॉटस्
उजवीकडे देण्यात आलेल्या या सर्व बटनांच्या मागच्या बाजूस सर्वात वरच्या बाजूस हेडफोन जॅक त्याखाली यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, रिसेट बटन, ओटीजी, माइक, मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि सर्वात खाली चार्जिंग पॉइंट देण्यात आला आहे.

वापर अडचणीचा
टॅब्लेट आडव्या अवस्थेत पकडल्यानंतर वरच्या बाजूस उजवीकडे आवाज कमी- अधिक करण्यासाठीची दोन बटने आणि त्याच्याच बाजूला ऑन- ऑफ बटन देण्यात आले आहे. मात्र ही बटने काहीशी खालच्या बाजूस असल्याने त्याचा वापर थोडा अडचणीचा वाटू शकतो.

फक्त बीएसएनएल
सिम कार्डासाठीचा स्लॉट हा खालच्या बाजूस देण्यात आला आहे. मात्र इतर सिम कार्डे त्यावर काम करत नाहीत, असे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. फ क्त बीएसएनएलचेच सिम कार्ड त्यावर काम करणार असेल तर ही मात्र या टॅब्लेटसाठी मर्यादा ठरू शकते.  

उजळ स्क्रीन
पेन्टा टॅब्लेटचा स्क्रीन मात्र इतर टॅब्लेटस्च्या स्क्रीनच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी उजळ आहे. तो ८०० (गुणिले) ५५२ पिक्सेल्स रिझोल्युशनचा आहे. मात्र हाताळणीदरम्यान त्याच्यावर उमटलेले बोटांचे ठसे अनेकदा खूप पुसल्यानंतरही तसेच राहतात आणि बाहेर असताना दृश्यात्मकतेवर ते कधीकधी परिणामही करतात. त्यामुळे स्क्रीनच्या संदर्भातील ही बाब उत्पादकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. बाहेरच्या उजेडात किंवा आतमध्ये अशा दोन्ही अवस्थेत टॅब्लेटचा स्क्रीन उत्तम असावाच लागतो.

ऑपरेटिंग सिस्टिम
बीएसएनएल- पेन्टासाठी अँड्रॉइड आइस्क्रीम सँडविच ही ४.०.३ ही अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टिम बाबतचा चांगला अनुभव वापरकर्त्यांस येतो.

प्री- लोडेड अ‍ॅप्स
टॅब्लेटस्ची गुणवत्ता अनेकदा ठरते ती त्याच्यामध्ये असलेल्या प्री- लोडेड प्रोग्रॅम्स किंवा अ‍ॅप्सवर. यामध्ये पोलारीस ऑफिस, मूव्ही स्टुडिओ, पीडीएफरीडर, फ्री नोट, फोटो एडिटर, स्काइप, फेसबुक अ‍ॅप यासारखी अनेक अ‍ॅप्स प्री- लोडेड स्वरूपात देण्यात आली आहेत. त्याचा फायदाच होतो.
अँड्रॉइड ब्राऊझिंग सोपे
नेट ब्राऊझिंगसाठी यामध्ये ऑपेरा आणि अँड्रॉइड असे दोन्ही ब्राऊझर्स देण्यात आले आहेत. दोन्ही ब्राऊझर्स वापरून पाहिले असता त्यात अँड्रॉइड ब्राऊझर अधिक वेगवान आणि वापरण्यास सोपा असल्याचे जाणवले.

१ गिगाहर्टझ् प्रोसेसर
यासाठी १ गिगाहर्टझ् प्रोसेसर वापरण्यात आल्याने त्या्च्यावेगात चांगलाच फरक पडला आहे. एका वेळेस दोन अ‍ॅप्स उघडल्यानंतरही त्याच्या वेगावर फारसा परिणाम होताना दिसत नाही. यावर व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही चांगले अनुभव देतात. मात्र त्याचा ऑडिओ जॅक फारसा चांगला नाही.

८ जीबी मेमरी
या टॅब्लेटला स्वतची अशा ८ जीबीची मेमरी असून ही वापरकर्त्यांसाठी अतिशय चांगली बाब आहे. शिवाय तुम्हाला मायक्रो एसडी कार्डाच्या माध्यमातून ती मेमरी वाढवताही येईल.

बॅटरी
सर्वसाधारणपण एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी तब्बल सहा तास व्यवस्थित काम करते, असा कंपनीचा दावा आहे. मात्र प्रत्यक्ष रिव्ह्य़ूदरम्यान काही असे आढळले नाही. मुश्कीलीने चार तास काढता आले.

चांगल्या बाबी
टॅब्लेटचा चांगला अनुभव, ८ इंची स्क्रीन,८ जीबी इंटर्नल मेमरी, वाय- फायची सोय

वैगुण्ये
फक्त बीएसएनएल सिमवरच काम करणे, अधिक असलेले वजन

भारतीय बाजारपेठेतील किंमत : रुपये ८,२९९/-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 3:13 am

Web Title: bsnl penta tablet
Next Stories
1 प्रभात संगीत
2 एलइडी टीव्ही- एओसी
3 पोर्ट्रॉनिक्स प्युअर साऊंड बार
Just Now!
X