06 July 2020

News Flash

मायक्रोसॉफ्टचा नोकिया एक्स २

नोकिया कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यापासून भारतातील निम्नकिंमत श्रेणीतील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने गेल्याच आठवडय़ात ‘नोकिया एक्स २’ बाजारात दाखल केला आहे.

| September 12, 2014 03:58 am

नोकिया कंपनी आपल्या ताब्यात घेतल्यापासून भारतातील निम्नकिंमत श्रेणीतील ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मायक्रोसॉफ्टने गेल्याच आठवडय़ात ‘नोकिया एक्स २’ बाजारात दाखल केला आहे. ‘नोकिया एक्स’ कुटुंबातील सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म २.०वर चालणारा हा स्मार्टफोन नोकिया, मायक्रोसॉफ्ट यांसोबतच अँड्रॉइडच्या अ‍ॅप्लिकेशन्सही चालवू शकतो. या फोनचा यूजर इंटरफेस अधिक सुलभ आणि आकर्षक असल्याचा कंपनीचा दावा आहे. ४.३ इंचाचा क्लीअर ब्लॅक डिस्प्ले, ऑटो फोकस आणि फ्लॅश असलेला पाच मेगापिक्सेल मागील कॅमेरा, व्हीजीए फ्रंट कॅमेरा, एक जीबी रॅम, १.२ गिगा हर्ट्झ डय़ुअल कोअर प्रोसेसर अशी या फोनची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या फोनची बॅटरी १८०० एमएएच क्षमतेची असून त्यातून 2जीवर १०, तर 3जीवर १३ तासांचा टॉकटाइम असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे. हा डय़ुअल सिम फोन आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यात व्हिज्युअल मल्टिटास्किंगची सुविधा आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करणे वापरकर्त्यांना सहज शक्य होणार आहे. शिवाय मायक्रोसॉफ्टने एअरटेलशी करार केला असून या फोनसोबत वापरकर्त्यांना सहा महिन्यांसाठी अँड्रॉइड अ‍ॅप्स मोफत डाउनलोड करता येणार आहे. या प्लॅनअंतर्गत वापरकर्त्यांना ५०० एमबीचा मोफत डाटावापर मिळतो. याशिवाय क्लाउड स्टोअरेजची सुविधाही या फोनमध्ये उपलब्ध असून त्यासाठी या फोनमध्ये वनड्राइव्हमार्फत १५जीबीची स्टोअरेज स्पेस पुरवण्यात आली आहे. भारतात या फोनची किंमत ८६९९ रुपये इतकी आहे.

जिओनीचा जीपॅड जी५
‘ईलाइफ ५.५’ या स्मार्टफोनच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या जिओनी या चिनी कंपनीने ‘जीपॅड जी५’ हा आणखी एक आकर्षक स्मार्टफोन बाजारात आणला आहे.  १.५ गिगाहर्ट्झ क्षमतेच्या हेक्सा कोअर प्रोसेसरवर चालणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड ४.४ ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत आहे. याचा डिस्प्ले ५.५ इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले असून त्यात १२८० बाय ७२० इतके रेझोल्यूशन मिळते. या फोनमध्ये एक जीबी रॅम असून इंटर्नल मेमरी आठ जीबी इतकी आहे. तर त्यात ३२ जीबी एक्स्टर्नल स्टोअरेजची भर टाकता येईल. या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे यातील डय़ुअल क्रिस्टल लाउड स्पीकर. या फोनचा बॅक कॅमेरा आठ, तर फंट्र कॅमेरा २ मेगा पिक्सेलचा आहे. यामध्ये जीपीएस, वायफाय, एफएम, ब्लूटुथ अशा नेहमीच्या सुविधा आहेत. या फोनची किंमत १४९९९ रुपये इतकी आहे.

आयबॉलचा 3जी बिझनेस टॅब्लेट
भारतीय बाजारात विविध प्रकारचे आणि विविध किंमत श्रेणीतील फोन आणि टॅब्ज आणलेल्या आयबॉलने मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीवर आधारित 3जी बिझनेस टॅब्लेट बाजारात आणला अहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग प्रणालीवर चालणाऱ्या या टॅब्लेटमध्ये इंटेल अ‍ॅटम प्रोसेसर बसवण्यात आला आहे. या आठ इंच टॅब्लेटला आयपीएस डिस्प्ले असून पाच मेगापिक्सेल बॅक आणि दोन मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये १६ जीबी इंटर्नल स्टोअरेज असून ती ६४ जीबीपर्यंत एक्स्टर्नल मेमरी कार्डनिशी वाढवता येईल. शिवाय यातील दोन जीबी रॅम टॅब्लेटला वेगवान बनवते. या टॅब्लेटसोबत आयबॉलने मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा एक वर्षांचा परवाना दिला आहे. याशिवाय विंडोज डिफेण्डर अँटिव्हायरस, फायरबॉल, एक टीबी क्लाउड स्टोअरेज स्पेस या सुविधाही या टॅब्लेटसोबत पुरवण्यात आल्या आहेत. या टॅब्लेटला कीबोर्ड, माउस, यूएसबी, प्रोजेक्टर, स्पीकर अशी उपकरणे जोडण्याची सुविधा आहे. तसेच 3जी सिमसाठीही स्लॉट असल्याने कनेक्टिव्हीटीही जलद मिळते. या टॅब्लेटची भारतातील किंमत १६९९९ रुपये इतकी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2014 3:58 am

Web Title: microsoft nokia x 2
टॅग Microsoft,Tech It
Next Stories
1 Tech नॉलेज : कोणता फोन घेऊ?
2 स्मार्ट जीवनशैलीची ‘अ‍ॅपल’ स्टाइल
3 सॅमसंगचा ‘गॅलेक्सी एस ५ मिनी’, किंमत २६,४९९ रुपये!
Just Now!
X