News Flash

प्रचारतोफा थंडावल्या, आता खलबते सुरू

प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता मतदानादिवशी मतदार कोणाच्या बाजून कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे

Devendra Fadnavis, kalyan dombivali , Election, BJP, Shivsena, loksatta, loskatta news, Marathi, Marathi news
कल्याण-डोंबिवली निकाल हाती येण्यास सुरूवात.

कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या १ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराची शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता सांगता झाली. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-भाजपचा प्रचार परस्परविरोधातील आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरत राहिला. तर, मनसेने नाशिकच्या विकास कामांचे सादरीकरण करून सत्ताधाऱयांवर कडी करण्याचा प्रयत्न केला.  काँग्रेस-राष्ट्रवादी मात्र प्रचारात कुठेच दिसून आली नाही. प्रचारतोफा थंडावल्यानंतर आता मतदानादिवशी मतदार कोणाच्या बाजून कौल देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. तर, प्रतिस्पर्धी उमेदवारांचे कार्यकर्ते फोडणे, मतांसाठी पैसेवाटप असे गैरप्रकार मतदानाच्या दिवशी सकाळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवलीमध्ये १२२ जागांसाठी एकूण ७४३ उमेदावर रिंगणात आहेत. तर कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांवर २०० हून अधिक उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. दोन्ही ठिकाणी १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजपर्यंत मतदान होईल तर, दुसऱयाच दिवशी म्हणजे २ नोव्हेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 6:01 pm

Web Title: election campaign ends for kalyan dombivali and kolhapur corporation
टॅग : Election Campaign,Kdmc
Next Stories
1 ‘असंगाशी संग’ भाजपला फायद्याचा की तोटय़ाचा?
2 भाजपच्या रक्तामध्ये भ्रष्टाचार – राणे
3 अखेरच्या दिवशी प्रचाराचा जोर वाढणार
Just Now!
X