05 July 2020

News Flash

आणखी सात नगरसेवक गोत्यात?

आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र ही दबंगगिरी मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे.

भाजपकडून महापौर पदासाठी शिवसेनेपुढे अडीच-अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावाला अद्यापही शिवसेनेची मंजूरी मिळालेली नाही.

बेकायदा बांधकामांच्या फायली ठाणे महापालिका आयुक्तांच्या टेबलावर

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त बेकायदा बांधकाम प्रकरणातील नगरसेवकांवर कारवाईला सुरुवात करताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही शहरात बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या नगरसेवकांविरोधात मोहीम छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी ठाणे महापालिकेतील तिघा ज्येष्ठ नगरसेवकांना घरी बसविल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशाच प्रकरणातील अन्य सात नगरसेवकांच्या फायली तपासण्यास घेतल्याचे समजते.
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी महापालिकेतील काही ठरावीक नगरसेवकांची नावे पुढे आल्यानंतर संबंधित महापालिकांमधील नगरसेवकांच्या सुवर्ण टोळ्यांचा विषयदेखील मोठय़ा चवीने चर्चिला जात आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे, कल्याण डोंबिवलीत अशा नगरसेवकांच्या सुवर्ण टोळ्या कार्यरत असल्याची चर्चा काही आजची नाही. असे असताना कल्याण डोंबिवलीत प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टोळ्यांचा जाहीरपणे उल्लेख करत ही साखळी मोडून काढण्याचे आदेश प्रशासकीय प्रमुखांना दिले. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांत मोठय़ा संख्येने बेकायदा बांधकामे उभी राहिली असून या पायावर पोसल्या गेलेल्या राजकीय व्यवस्थेला वर्षांनुवर्षे राजाश्रय लाभला आहे. कळवा येथे एका बेकायदा बांधकामावर कारवाई करावयास गेलेल्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्ताला माजी महापौर आणि या भागातील बडे प्रस्थ मनोहर साळवी यांनी मारहाण केल्याचे प्रकरण उघडकीस येऊनही त्या विरोधात राजकीय वर्तुळात साधा ब्रदेखील उच्चारण्याची िहमत कुणी दाखवली नव्हती. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र ही दबंगगिरी मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे.
साळवी यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम एगडे, मनसेचे शैलेश पाटील या दोघा नगरसेवकांचे पदही बेकायदा बांधकामप्रकरणी रद्द करण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला. राम एगडे यांनी बायकोच्या नावाने बेकायदा घर खरेदी केल्याची तक्रार होती, तर पाटील यांनी दिवा येथे स्वतच्या जागेत बेकायदा बांधकाम उभे केल्याचा आरोप या भागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या कडक भूमिकेनंतर जयस्वाल यांनी मात्र तातडीने पाऊल उचलत या तिघांचे पद रद्द केले आहे. दरम्यान, ठाण्यातील आणखी सात नगरसेवकांवर बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यासंबंधीच्या नस्ती आयुक्तांकडे सुनावणीसाठी आहेत, अशी माहिती आहे.

कल्याणमधील आठ नगरसेवकांवर टांगती तलवार
कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई.रवींद्रन यांनी बेकायदा बांधकामप्रकरणी काही नगरसेवकांना यापूर्वीच नोटिसा बजाविल्या आहेत. त्यापैकी सचिन पोटे यांचे पद रद्द करण्यात आले असून त्यांच्या पत्नी महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनाही अशा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आता पालिकेत नव्याने निवडून आलेल्या आठ जुन्या नगरसेवकांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2015 4:56 am

Web Title: more 7 corporators in trouble
टॅग Corporators,Trouble
Next Stories
1 सहा महिन्यांत ठाणे वायफाय ! मुख्यमंत्र्यांची घोषणा
2 आली दिवाळी..
3 गुन्हे वृत्त
Just Now!
X