डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली जवळील खंबाळपाडा येथे एक ३० वर्षाचा मित्र आणि त्याची २२ वर्षाची मैत्रिणी लिव्ह इन रिलेनशिपमध्ये राहत होते. ते लग्न करणार होते. या दोघांमध्ये जेवण बनविण्यावरून आणि मित्राच्या सदऱ्यावर तेलाचे डाग पडल्यावरून झालेल्या वादातून मैत्रिणीने रागाच्या भरात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोमवारी संध्याकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान या मित्राच्या कांचनगाव खंबाळपाडा येथील राहत्या घरात हा प्रकार घडला आहे. मानसी संतोष नवघने (२२) असे मृत महिलेचे नाव आहे. मानसीचा एक तीस वर्षाचा नोकरदार मित्र यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची माहिती दिल्यावर पोलिसांनी नोंद करून घेतली आहे.

मयत महिलेच्या मित्राने टिळकनगर पोलीस ठाण्यात दिलेली माहिती अशी, की तक्रारदार मित्र आणि त्याची मैत्रिण मानसी नवघने हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मानसी प्रमाणापेक्षा अधिकचे जेवन बनविते यावरून दोघांच्यात वाद झाला होता. या वादातून मानसीने मित्राला कार्यालयात जाण्यासाठी भोजनाचा डबा दिला नाही. मित्राने बाहेरून मांसाहरी बिर्याणी खरेदी केली. ते जेवणाचे पुडके आपल्या कार्यालयात जाणाऱ्या पिशवीत ठेवले.

बिर्याणीमधील तेल पिशवीला लागून ते मित्राच्या सदरा आणि बनियनला लागले. मैत्रिणीने मित्राला तुझ्या सदरा आणि बनियनला कसले डागे लागले आहेत, असे प्रश्न केले. मित्राने मैत्रिणीला ‘तु घरातून जेवणाचा डबा दिला नाहीस म्हणून मी बाहेरून मांसाहरी बिर्याणीचे पुडके खरेदी केले. ते पुडके कार्यालयीन पिशवीत ठेवले. त्यावेळी बिर्याणीमधून तेल बाहेर आले. ते तेल माझ्या सदरा आणि बनियनाल लागले’ असे मित्राने मैत्रिण मानसी यांना सांगितले. मित्राच्या बोलण्यावर विश्वास न ठेऊन मानसीने मित्राच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यामुळे मित्र संतप्त झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मित्र आणि मैत्रिणींमध्ये या विषयावरून भांडण झाले. आपले लग्न जवळ आले आहे. तु आता किरकोळ कारणावरून का भांडतेस, असे प्रश्न मित्राने मैत्रिणीला केले. आता तू लग्न कसा करतेस ती मी बघते, असे रागात बोलून मानसीने घरातील केस कापाचे यंत्र घेऊन ती स्नानगृहात गेली. तिने डोक्यावरील सगळे केस स्वताच्या हाताने कापून टाकले. हा प्रकार पाहून मित्राने मी घर सोडून जातो असे बोलून मित्र बाहेर जाण्यास निघाला. त्यावेळी मैत्रिणीने तुला जायचे तेथे जा, असे बोलून ती रागात शय्यागृहात केली. दरवाजा आतून बंद केला. त्या खोलीत गळफास घेतला. मित्राच्या हा प्रकार नंतर लक्षात आल्यावर त्याने दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. मित्राने तातडीने मानसीला शास्त्रीनगर रुग्णालयात आणले. ती मृत झाली होती. टिळकनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.