महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर आस्थापनांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली असून या कारवाईमध्ये सुमारे ११४ किलो प्लास्टिक जप्त करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अविघटनशील कचरा ( नियंत्रण ) कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाने प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुकवर बंदी घातली आहे. तरीही ठाणे महापालिका क्षेत्रात बंदी असलेल्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंचा वापर सुरू असून अशा आस्थापनांवर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या पथकाने अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत एकूण ११४ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.