ठाणे जिल्ह्यात ३६ महिन्यात १८ बालविवाह रोखण्यात यश; ठाणे आणि कल्याण तालुक्यांतही बालविवाह

ठाणे आणि कल्याण या तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.

18 child marriages in 36 months in thane
बालविवाह ( Image – लोकसत्ता टीम )

स्नेहा जाधव – काकडे,

ठाणे जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, मुंबई लगत असलेल्या या ठाणे जिल्ह्यात शहरीकरण होऊनही छुप्या पद्धतीने बालविवाह सुरूच असल्याचे वास्तवही समोर आले आहे. विशेष म्हणजे, ठाणे आणि कल्याण या तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत.

करोनाकाळामध्ये आर्थिक परिस्थिती बिकट असलेमुळे अनेक मुलींना पालकांच्या दबावापोटी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काही मुलींचे करोनाकाळात त्यांच्या पलकांनी विवाहदेखील पार पाडले. त्यांना पुढे शिकण्याची ईच्छा असतानाही असतानाही त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यातच १ मार्च २०२० ते १ मार्च २०२३ या कालावधीत १८ बालविवाह रोखण्यात आल्याचे समोर आहे. करोनाकाळात अनेक निर्बंध राज्य शासकाकडून आखण्यात आले होते. करोनाकाळातच बालविवाहाचे प्रमाण अधिक होते. या वर्षी मागील तीन महिन्यात एक बालविवाह रोखला गेला. तर यावर्षाच्या तुलनेत २०२२ यावर्षी ५ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. बाल संरक्षण कक्ष, स्थानिक पोलिस, सामाजिक संस्था, महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून हे विवाह रोखण्यात यश आले आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील कुष्ठरुग्ण सेवक गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार

प्राप्त माहितीच्या आधारे झालेल्या कारवाईत मार्च २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात १ बालविवाह रोखण्यात आले. यापूर्वी २०२२ मध्ये ५ बालविवाह रोखले गेले होते. तर २०२१ मध्ये सर्वाधिक ८ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकीकडे समाजात जनजागृती वाढत असताना नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने कारवाईत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सधन तालुक्यांमध्ये बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे. ठाणे आणि कल्याण तालुक्यात प्रत्येकी पाच तक्रारी नोंदविल्या गेल्या. त्यापाठोपाठ उल्हासनगर ३, शहापूर आणि भिवंडीमध्ये प्रत्येकी २, तर सर्वात कमी तक्रारी म्हणजेच १ तक्रार मुरबाड तालुक्यातून नोंदविण्यात आल्या.

हेही वाचा >>> कल्याण: सीएसएमटी-कल्याण दरम्यान हावडा मेलमध्ये फेरीवाल्यांनी प्रवाशाला लुटले

महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी दिसून येते. करोनाकाळामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमध्ये आर्थिक टंचाई, मुलींवर लादण्यात आलेले विविध प्रकारचे निर्बंध, पैसे नसल्यामुळे मुलींची लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र त्याचवेळी अवैधरित्या होणारे हे विवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे यासाठी हेल्पलाइन, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरित्या काम केल्याने २०२१ या वर्षी ८ बालविवाह रोखण्यात य़श मिळाले आहे.

१०९८ वर संपर्क साधा

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या काटेकोर अंमलबजावणीची गरज आहे. अनेकदा मुलींना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. अवैधरित्या होणाऱ्या बालविवाहासंदर्भात माहिती मिळाल्यास ते रोखण्यासाठी १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येतो.

२०२० ते २०२३ मध्ये रोखलेले बालविवाह

वर्ष रोखलेले बालविवाह

२०२० – ४

२०२१ – ८

२०२२ – ५

२०२३ – १

एकूण- १८

मार्च २०२२ ते मार्च २०२३ या वर्षात तालुकानिहाय आलेल्या तक्रारी

तालुका तक्रारी

ठाणे – ५

कल्याण – ५

उल्हासनगर – ३

शहापूर – ३

भिवंडी – २

मुरबाड – १

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 16:23 IST
Next Story
डोंबिवलीतील कुष्ठरुग्ण सेवक गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार
Exit mobile version