कल्याण: कल्याण पश्चिमेतील कोळीवली रस्त्यावरील एका चाळीत राहत असलेल्या महिलेच्या घरात शिरून एका अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने हल्ला करुन महिलेला गंभीर जखमी केले. रविवारी रात्री हा प्रकार घडला.

या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनम पाल असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळीवली रस्त्यावरील एका चाळीत सोनम आपल्या पतीसह राहते. पती नीतेश याच भागातील एका बेकरीमध्ये नोकरी करतो. रविवारी रात्री तो बेकरीत काम करण्यासाठी गेल्यानंतर सोनम घरात झोपली होती.

हेही वाचा… शिळफाटा कोळेगाव येथे कार नाल्यात पडली; पाच प्रवासी जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घराच्या खिडकीतून अज्ञात इसम धारदार शस्त्र घेऊन आला. त्याने सोनमवर वार केले. सोनमने चोर म्हणून ओरडा करताच इसम खिडकीतून अंधाराचा फायदा घेत पळून गेला. खडकपाडा पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासून या प्रकरणाचा तपास करत आहेत.