scorecardresearch

Premium

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मीरा रोड येथून ‘विकसित भारत संकल्प जोडो’ यात्रेत सहभाग

देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला.

central minister piyush goyal news in marathi, vikasit bharat sankalp jodo yatra in marathi
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा मीरा रोड येथून 'विकसित भारत संकल्प जोडो' यात्रेत सहभाग (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

भाईंदर : देशभरात सुरु असलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ महाराष्ट्र राज्यातून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरेन्सद्वारे सहभाग नोंदवला. यासाठी मीरा रोड येथे मीरा भाईंदर महापालिकेकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. या अंतर्गत ९ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांना संबोधित केले. यावेळी मोदी यांनी केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. शिवाय याचा लाभ घेतलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.

हेही वाचा : उल्हासनगर: महाराष्ट्रात पहिल्यांदाच रूग्णालयात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड

Agitation of contract electricity workers in Nagpur city
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात कंत्राटी वीज कर्मचारी रस्त्यावर; ‘या’ आहेत मागण्या…
farmer protest
शेतकर्‍यांबरोबर चर्चेच्या चौथ्या फेरीत काय ठरले? शेतकऱ्यांसाठी केंद्राची पंचवार्षिक योजना काय आहे?
adarsh Mention in shwetpatrika
श्वेतपत्रिकेतील आदर्श उल्लेखानंतर राजकीय भूकंप, सिंचन घोटाळ्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत बंड
nagpur crime news, nandanvan area crime news,
गृहमंत्र्यांच्या शहरात आणखी दोन हत्याकांड… उपराजधानातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

महाराष्ट्र राज्यातून यात केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सहभाग घेतला होता. यासाठी मीरा रोड येथील बुद्ध विहार व विपश्यना केंद्रात असलेल्या सभागृहात मोठा एलईडी टीव्ही लावून महापालिकेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गोयल यांच्यासह महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, आमदार गीता जैन, आयुक्त संजय काटकर, भाजप जिल्हा अध्यक्ष किशोर शर्मा, माजी महापौर ज्योस्त्ना हसनाळे, विधानसभा प्रमुख रवि व्यास, महिला जिल्हा अध्यक्ष अनिता पाटील आणि इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

‘विकासभारत दुत’ बनण्याचे नागरिकांना आवाहन

देशात नरेंद्र मोदी सरकार मार्फत विविध योजना राबावल्या जात आहेत. याचा मोठा लाभ हा मध्यम वर्ग व गरीब नागरिकांना व्हावा हा हेतू आहे. यासाठीच ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे’ आयोजन करण्यात आले. त्यामुळे समाजात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नागरिकांनी आपल्या समाजातील गरजू लोकांपर्यत केंद्र शासनाचे उपक्रम पोहोचवावे म्हणून स्वतः ‘विकास भारतदुत’ म्हणून जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कार्यक्रमाला उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांना केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central minister piyush goyal participated in vikasit bharat sankalp jodo yatra from mira road css

First published on: 09-12-2023 at 14:06 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×