हजार रुपयांच्या वादातून एका गॅरेज मेकॅनिकवर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिममध्ये घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून चाकूने हल्ला करणारा आरोपी सागर माळवे याला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या फरार दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. हसन खोत असं जखमी कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्यावर मुंबई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> ‘पेट्रोल, डिझेल संपणार, आता..,’ पर्यायी इंधनावर नितीन गडकरी यांचे मोठे विधान

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरात असलेल्या एका गॅरेजमध्ये हसन खोत हा तरुण काम करतो .या गॅरेजच्या शेजारी गाड्यांचे वॉशिंग सेंटर आहे. हसन गॅरेजमधील एक गाडी घेऊन बाजूच्या या वॉशिंग सेंटरमध्ये गेला. येथे हसनने गाडी धुण्यासाठी उभी केली. मात्र याच वेळी आरोपी सागर माळवे तिथे आला. त्याने तुझ्याकडे आधीचे एक हजार रुपये बाकी आहेत ते आधी दे, असं हसनला सांगितलं. हसनने माझा मालक पैसे देईल असे उत्तर दिले.

हेही वाचा >>> “महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, पण…”, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका!

मात्र याच दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यामुळे संतापलेल्या सागर व त्याच्या दोन साथीदारांनी हसनला बेदम मारहाण केली. सागरने हसनवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात हसन गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “…हे महाराष्ट्राला न शोभणारं आहे”, भाजपाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं टीकास्त्र!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सागर माळवे व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सागर माळवे याला अटक केली आहे. तर मारहाण करणारे त्याचे दोन साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.