डोंबिवली : येथील एमआयडीसी मधील कावेरी चौकात बुधवारी संध्याकाळी मद्य सेवन करून टेम्पो चालविणाऱ्या एका चालकाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

बुध्दशल खंडारे (१६, रा. सोनारपाडा) मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. वैभव शेंडगे (१६) जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मद्य सेवन करून टेम्पो चालविणाऱ्या चालकाला नागरिकांकडून पकडून बेदम चोप दिला आणि त्यानंतर मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. बुध्दशल खंडारे डोंबिवली एमआयडीसीतील एका शाळेचा विद्यार्थी होता. तो इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुषार होता, असे त्याच्या शिक्षकांनी सांगितले. बुध्दशल आणि वैभव यांच्या परीक्षा सुरू आहेत. बुध्दशल आणि वैभव दोघे संध्याकाळी खासगी शिकवणीला गेले होते. दुचाकीवरून ते एमआयडीसीतील कावेरी चौकातून जात घरी परतत होते. यावेळी फेरीवाले, पादचाऱ्यांनी गजबजलेल्या कावेरी चौकातून एक टेम्पो चालक भरधाव वेगाने टेम्पो चालवत होता.

हेही वाचा : Kopari Pachpakhadi : कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या टेम्पो चालकाने मद्य सेवन केले होते. कावेरी चौकात आल्यावर चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले. त्याने बुध्दशल खंडारे, वैभव बसलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत बुध्दशल टेम्पोची जोराची धडक बसल्याने जागीच ठार झाला. वैभव टेम्पोच्या धडकेत दूर फेकला गेल्याने तो थोडक्यात बचावला. त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघात होताच नागरिकांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना कळविले आणि मद्याच्या धुंदीत असलेल्या टेम्पो चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे यांनी सांगितले, याप्रकरणी सविस्तर माहिती हाती आली नाही मात्र टेम्पो चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.