कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात तीन तृतीय पंथीय आणि त्यांच्या सहकाऱ्याने रात्रीच्या वेळेत एका महिलेचा मार्ग रोखून त्यांच्याकडे २० हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली. तसेच, अश्लिल भाषेत शिवीगाळ करून तृतीय पंथीयांनी संगनमत करून महिलेला आणि तिच्या लहान मुलीला मारहाण केली. पाच दिवसापूर्वी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार महिला या खडकपाडा भागात फ्लाॅवर व्हॅली भागात राहतात. मुलीची तब्येत ठीक नसल्याने त्या आपल्या लहान मुलीला घेऊन रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान दवाखान्यात चालल्या होत्या.

सोसायटीच्या प्रवेशव्दाराच्या बाहेर पडल्यावर कल्याण पूर्वेतील नेतिवली भागात राहत असलेल्या तीन तृतीय पंथीय आणि त्यांचा एक साथीदार यांनी संगनमत करून महिलेला रस्त्यात अडविले. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. २० हजार रूपयांची मागणी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिला पैसे देत नाही म्हणून चारही जणांनी महिलेला ठोशाबुक्क्यांनी, लाथांनी मारहाण केली. मागणीची रक्कम दिली नाहीतर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तिन्ही तृतीय पंथीयांनी आजारी असलेल्या लहान मुलीलाही मारहाण केली. या महिलेसोबत तृतीय पंथीय महिलांनी अश्लिल कृत्य केले. या तिन्ही तृतीय पंथीयांची त्यांच्या संस्थेच्या प्रमुखाकडे तक्रारदार महिलेने तक्रार केली होती. त्याची दखल घेतली नसल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.