ठाणे : जव्हार मोखाड्यापेक्षा कल्याण सुधारला असे कपिल पाटील यांचे म्हणणे असेल तर त्यांनी एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा आणि मग त्यानंतर कळेल की चष्मा कोणाला बदलण्याची गरज आहे, असे प्रत्युत्तर अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी दिले आहे. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमधून प्रवास करूया म्हणजे नागरिकांना प्रवासादरम्यान काय हाल सोसावे लागतात हेही समजेल, अशी टीकाही त्यांनी केले आहे

खासदार कपिल पाटील यांनी सोनाळे आणि सापगाव ही दोन गावे दत्तक घेतली होती यातील भिवंडी तालुक्यामध्ये सोनाळे गाव येथे तर शहापूर तालुक्यामध्ये सापगाव येथे या दोन्ही गावांमध्ये आपण पाहणी करून लोकांची चर्चा केली तर कुणाला डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे किंवा चष्मा बदलण्याची गरज आहे हे समजून येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा : उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

जव्हार मोखाड्यापेक्षा कल्याण सुधारला असे कपिल पाटील यांचे म्हणणे असेल तर त्यांनी एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा आणि मग त्यानंतर कळेल की चष्मा कोणाला बदलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. कल्याणमधील मोहने गावात फिरल्यावर दिसून येते की, इथे रस्ते नाहीत. पार्टस स्मार्ट सिटी मध्ये अशी परिस्थिती आहे. बदलापूर मध्ये पाणी टंचाईची समस्या भयानक आहे. रेल्वेची समस्या ही मोठी आहे. यामुळेच खासदार कपिल पाटील यांनी संपूर्ण एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा, असे आव्हानही त्यांनी पाटील यांना दिले.

हेही वाचा : उकाड्याच्या होरपळीत कल्याणमध्ये विजेचा लपंडाव, उकाड्याने नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार कपिल पाटील हे सांगत असतील डोळ्याचा चष्मा बदल तर मी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आम्ही दोघे मान्य करून चष्मा बदलू पण, खासदार कपिल पाटील यांनी संपूर्ण एक दिवस माझ्यासोबत संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करावा. जेणेकरून मतदार संघातील परिस्थिती समोर येईल आणि कुणाला चष्मा बदलण्याची गरज आहे हेही समजेल, अशी टीकाही त्यांनी केली.