ठाणे : ठाण्यात दहशत प्रचंड वाढलेली आहे. आमच्याकडे प्रवेश करा, नाहीतर त्रास देऊ अशा धमक्या दिल्या जात आहेत. चुकीच्या पद्धतीने कामे सुरू आहेत. सत्ताधाऱ्यांनी ठाणे बरबाद करून टाकले आहे, कामे करायची नाहीत, बिले काढायची असे सुरु झाले आहेत. सत्ता आल्यानंतर सर्व कामांची चौकशी आम्ही करू. अधिकारी पाणी विकत आहेत. आता ठाण्यात दहशत चालणार नाही आणि आता यापुढे पैशावर नाही, कामावर निवडणूका होतील. बाळासाहेबांनी ओरिजनल फौज ठाण्याच्या रस्त्यावर उतरणार असल्याचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिला.

शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तीन हात नाका येथील टीप टॉप पार पडली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना (ठाकरे गट ) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख अनिश गाढवे उपस्थित होते.

ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा ज्यांना ज्यांना कंटाळा आला आहे त्यांनी देखील या मोर्चात मनस्वी सहभागी व्हावे असे आवाहन राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केले आहे.

ठाण्यात प्रचंड दहशत, पण आम्ही घाबरत नाही

ठाण्यात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. दहशतीमुळे अनेकजण त्यांच्या पक्षात आहे. ते तेथे मनापासून नाहीत. महापालिका आणि पोलिसांच्या कारवाईमुळे भितीमुळे ते त्याठिकाणी आहेत. आम्ही रस्त्यावरची लढाई एकत्र लढण्याची ठरविली आहे. आम्ही आता घाबरणार नाही. ठाण्यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. एकाच कामाचे अनेकदा कामे काढली जातात. जुने ठराव बनवून पुन्हा निधी काढल्या जातात. महापालिका अडीच ते तीन वर्षांत लुटलेली आहे. महाविकास आघाडी आणि मनसेची सत्ता आल्यावर या सर्वांची चौकशी होणार असा इसारा जाधव यांनी दिला. घोडबंदरला टँकर माफिया भेटून अधिकारीच पाणी विकत आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन गडकरी रंयातन ते ठाणे महापालिका असा मोर्चा काढणार आहोत असेही जाधव यांनी सांगितले.