Jitendra Awhad on Chhatrapati Shivaji Maharaj Temple in Mumbra : आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “तुम्ही म्हणता सगळीकडे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार, चला तर मग आपण मुंब्र्याला शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिलं मंदिर तिथे उभारु आणि छत्रपती शिवरायांना नमन करू.” फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना हे खुलं आव्हान दिल्यानंतर यावर आता महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. आव्हाड म्हणाले, “मला शासनाची परवानगी व जागा द्या, मी मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतो आणि तिथे उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलावतो.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही. मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर शिल्प आहे. ऐतिहासिक मुंब्रा देवी या मुंब्र्यातच आहे. मला शासनाची परवानगी द्या, जागा द्या, पुतळा द्या, मी पुतळा उभारतो आणि उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाला बोलवतो. तुम्ही (देवेंद्र फडणवीस) एखाद्या शहराला, एका धर्माला बदनाम का करत आहात? मुसलमान कोणाचे तरी शत्रू आहेत असं दाखवायचा प्रयत्न का करताय? शिवाजी महाराज मुसलमानांचे शत्रू नव्हते. मदारी मेहतर का गेला शिवाजी महराजांबरोबर? मी अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम मतदार आहेत, ५० टक्के हिंदू आहेत.

NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> MNS Hingana Assembly Constituency : उमेदवार असतानाही भाजपाच्या उमेदवाराला मनसेचा जाहीर पाठिंबा; राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय?

उगाच एका धर्माला बदनाम करू नका : जितेंद्र आव्हाड

यावेळी आव्हाड यांनी भारतीय संविधानाची एक लाल रंगाची प्रत दाखवली आणि ते म्हणाले, “हे तेच संविधान आहे जे राहुल गांधी यांनी दाखवलं होतं. लाल रंगाचा अर्थ काय असतो? प्रेम, हृदय क्रांतीचा रंग लाल आहे. हृदयाचा रंग लाल आहे, त्याचा नक्षलवाद्यांशी काय संबंध? तुमची (देवेंद्र फडणवीस) वक्तव्ये लहान मुलांचा खेळ वाटतात. त्यासाठी उगाच मुंब्र्याला बदनाम करू नका. स्टेशनच्या बाजूला आम्ही सुंदर मंदिर बांधून दिलं आहे”.

हे ही वाचा >> Suresh Dhas : महायुतीमधील वाद चव्हाट्यावर? “घड्याळाचे आधीच १२ वाजलेत”, भाजपा नेत्याचा अजित पवारांवर हल्लाबोल

राज ठाकरेंवरही टीका

आमदार आव्हाड म्हणाले, “राज ठाकरे म्हणाले होते मदरशांमध्ये बंदुका मिळतील. तुम्हाला हिंदूंना मुसलमानांविरोधात भडकवायचं आहे. तुमची अर्बन नक्षलवादासंबंधीची वक्तव्ये म्हणजे बालिशपणा आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते कोणालाही मध्ये आणतील. कारण त्यांना केवळ सत्ता हवी आहे. तुम्ही मुंब्र्यात चौकशी लावा आणि सिद्ध करून दाखवा की येथे बांगलादेशी व पाकिस्तानी राहतात. मुंब्र्याला लक्ष्य करून तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे? मुंब्र्यात बांगलादेशी, पाकिस्तानी लोक राहत असल्याचं तुम्हाला माहिती होतं तर आधीच त्यांना का पडकलं नाही? अशा कुठल्या संघटना आहेत, अथवा असतील तर त्यांची नावं जाहीर करा.

आमदार आव्हाड म्हणाले, “सुधीर मुनगंटीवार ज्या मतदारसंघात पडले, तिथे फार मुस्लीम नागरिक नाहीत. मग ते कसे काय पडले? लोकसभा निवडणुकीत ३१ मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पडले. त्यापैकी किती मतदासंघांमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे? तुम्ही (भाजपा) अयोध्येत मंदिर बांधलं, मग त्या मतदारसंघात तुम्ही का पडलात? या प्रश्नांचा कधी विचार केला आहे का?

Story img Loader