ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगरमधील भुखंडावर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली वाहनतळाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या नव्या आराखड्यानुसार ५४५ ऐवजी ७१८ वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात येणार असून दुचाकी वगळून तीन आणि चारचाकी वाहनांसाठीच हे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. एकूणच नव्या आराखड्यामुळे वाहनतळाची क्षमतेत वाढ होणार आहे.

ठाणे शहरातील विविध रस्त्यांवर बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून या प्रकाराला आळा बसावा यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून वाहनतळांची उभारणी करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगरमधील पी -४२ या भुखंडावर ५७९ वाहन क्षमतेचे बहुमजली वाहनतळ उभारणीचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ठाणे शहरातील वागळे इस्टेट भागात औद्योगिक क्षेत्राची स्थापना १९६० साली केली. या भागाचे क्षेत्रफळ २५७.२३ हेक्टर इतके आहे. या क्षेत्रात औद्योगिक, व्यापारी, सुविधा असे एकूण ८९९ भुखंड आरेखित आहेत.

helmets Taloja, bike riders helmets Taloja,
पनवले : हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांकडून हेल्मेटचे वाटप
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Action against cyber thieves by Central Crime Investigation Department Pune print news
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाई; पुण्यासह देशभरात ३२ ठिकाणी छापे, २६ जणांना अटक
CIDCO will draw lots on 2 October with higher premiums for eighth and tenth floor homes
नवी मुंबई : वरच्या मजल्यांवरील घरे महाग? सिडको महागृहनिर्माण सोडतीमधील अंतिम धोरण लवकरच, खासगी विकासकांप्रमाणे निर्णय
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
adulterated edible oil, Food and Drug Administration,
मुंबई : भेसळयुक्त खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई; सणासुदीनिमित्त अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
Pimpri, Notice to Engineers, Road Repair Works pimpri,
पिंपरी : रस्ते दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यांना नोटीस; काय आहे कारण?
MMRDA to construct a flyover at Kalyan Phata Chowk To solve traffic problem
कल्याण-शीळ फाटा कोंडीमुक्त होणार? उड्डाण पूल व भुयारी मार्ग ४२ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य

हे ही वाचा…बदलापूर : ‘ती’ शाळा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; पालकांशी संवाद सुरू, प्रशासकांच्या हालचाली

त्यापैकी ६९८ औद्योगिक भुखंडाचे उद्योजकांना वाटप करण्यात आले आहे. ६९८ पैकी ६१७ भुखंडावर कारखाने सुरू आहेत. महामंडळाने औद्योगिक क्षेत्रातील ५३ भुखंड निवासी म्हणून आरक्षित केले आहेत. तसेच वागळे इस्टेटमधील औद्योगिक क्षेत्र हे २००६ पासून माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या वसाहतींमध्ये रस्त्यावर बेकायदा वाहने उभी केली जात असून यामुळे कोंडीची समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाहनतळ उभारणीचा घेण्यात आला होता.

त्यानुसार वागळे इस्टेटमधील नेहरूनगर भागात वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव तयार करून त्यास मान्यता देण्यात आली होती. त्याचे भुमीपुजन सात महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होते. वाहनतळाची क्षमता वाढवून जास्तीत जास्त वाहने उभे राहतील याची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी भुमीपुजन कार्यक्रमादरम्यान दिले होते. त्यानुसार महामंडळाने आराखड्यात बदल करून वाहनतळाची क्षमता वाढविली आहे.

हे ही वाचा…लोणी खाणाऱ्याची हंडी दोन महिन्यांनी फोडणार; शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाच्या वक्तव्याने पुन्हा चर्चा

आराखड्यात बदल

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-४२ येथे बहुमजली वाहनतळ इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. जुन्या आराखड्यानुसार तळ अधिक पाच मजली इमारत बांधण्यात येणार होती. इमारतीच्या गच्चीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जाणार होता. या कामासाठी ३१ कोटी २२ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे. १३९ दुचाकी, १४७ तीनचाकी, २५९ चारचाकी असे एकूण ५८९ क्षमतेचे वाहनतळ होते. ३२६७ चौ.मी भुखंडावर १३३१०.०३ चौमी इतके बांधीव क्षेत्र असणार आहे. हा आराखडा रद्द करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार तळ अधिक सात मजली इमारत बांधण्यात येणार असून इमारतीच्या गच्चीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जाणार आहे. यात दुचाकी वगळण्यात आल्या आहेत. ३४१ तीनचाकी, ३७७ चारचाकी असे एकूण ७१८ क्षमतेचे वाहनतळ असणार आहे. ३२६७ चौ.मी भुखंडावर १९२७५.८४ चौमी इतके बांधीव क्षेत्र असणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.7