लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील मानपाडा रस्त्यावरील सागाव वरचा पाडा येथील एका इमारतीच्या संरक्षक भिंतीच्या कोपऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागाव वरचा पाडा येथील काळुबाई काथोड इमारत आणि चावरे इंजिनिअरिंग कंपनीच्या जवळ रस्त्यावर एक पुरुष जातीचे मृत नवजात अर्भक टाकण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांना काळुबाई दर्शन इमारतीमधील रहिवासी पांडुरंग भोईर यांच्या माध्यमातून समजली. घटनास्थळी पोलीस येईपर्यंत या भागात पादचाऱ्यांची गर्दी जमली होती. काल संध्याकाळी हा प्रकार निदर्शनास आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-बदलापूर: तूर्तास भार नियमन नाही, महावितरणकडून स्पष्टोक्ती; नागरीकांना दिलासा

या मृत नवजात बालकाच्या पालकांनी बाळाची गुप्तपणे विल्हेवाट लावण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस हा गैरप्रकार करणाऱ्या पालकांचा शोध घेत आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. गोरे याप्रकरणाचा तपास करत आहेत.