scorecardresearch

कल्याणमध्ये रुक्मिणीबाई, डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात स्वतंत्र कक्ष; कल्याण-डोंबिवलीत कॉर्बेव्हॅक्स लशीचे ६० हजार लाभार्थी

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कॉर्बेव्हॅक्स लसीचे लसीकरण पालिकेने सुरू केले आहे. या वयोगटातील लाभार्थीची संख्या ६० हजार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील १२ ते १४ वयोगटातील मुलांचे कॉर्बेव्हॅक्स लसीचे लसीकरण पालिकेने सुरू केले आहे. या वयोगटातील लाभार्थीची संख्या ६० हजार आहे. पालिकेच्या येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात या लसीकरणाचा शुभारंभ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

कल्याणमधील एका १४ वर्षांच्या मुलीला कॉर्बेव्हॅक्स लशीची मात्रा देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, डॉ. समीर सरवणकर उपस्थित होते.  १२ ते १४ वयोगटातील मुलांना कल्याणमध्ये बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात, डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात येथे कॉर्बेव्हॅक्स लशीची मात्रा देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या लशीची दुसरी मात्रा लाभार्थीना २८ दिवसाच्या अंतराने देण्यात येणार आहे, असे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

ज्या शाळांच्या परीक्षा झाल्या आहेत, त्या शाळांमधील विद्यार्थी, पालकांनी या लसीकरण सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

२४ तास नेत्रदान सुविधा

ल्ल कल्याण -डोंबिवली पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पालिकेने २४ तास नेत्रदानाची सुविधा नेत्रदात्यांना उपलब्ध करून दिली आहे. नेत्रदानासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे या रुग्णालयाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले.

ल्ल नेत्रदान सुविधेसाठी पालिकेने मातोश्री गोमतीबेन रतनशीभाई छेडा साहरिया नेत्रदान बँकेबरोबर सामंजस्य करार केला आहे. मृत व्यक्तीचे नेत्रदान करून घेण्यापूर्वी त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले जाते. या सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली जाते, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले. नेत्रदानासाठी इच्छुकांसाठी संपर्क- ९३२०६११९१९.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rukminibai kalyan separate ward shastrinagara hospital dombivali 60000 beneficiaries corbevax vaccine kalyan dombivali amy

ताज्या बातम्या