Mumbai University Youth Festival / ठाणे – मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव हा विद्यापीठ स्तरावरील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि विविध कलांचा मेळ साधणारा महोत्सव आहे. यंदा या महोत्सवाचे ५८ वे वर्ष होते.
युवा महोत्सवात विविध कला, साहित्य, संगीत, नृत्य, नाटक आणि इतर विभागातील स्पर्धा पार पडतात. या महोत्सवामध्ये राज्यभरातून महाविद्यालये सहभागी होतात. दरम्यान यंदाच्या युवा महोत्सवातही ठाण्यातील महाविद्यालयांनी सहभाग दर्शवत विभागांतील विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाच्या विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या मुंबई विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक आणि सांस्कृतिक कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवात संगीत, नृत्य, ललित कला, साहित्य आणि नाट्य या विभागातील स्पर्धा पार पडतात. यामध्ये शास्त्रीय, पाश्चात्य, भारतीय असे प्रकार असतात.
गायन, वादन, एकांकिका, मिमिक्री, वक्तृत्व, वादविवाद, कोलाज, रांगोळी, मेहंदी, छायाचित्रिकरण अशा विविध स्पर्धांचा यात समावेश असतो. या महोत्सवात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे सादरीकरण राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये करता येते.
अशातच ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय, सतीश प्रधान ज्ञानसाधना विद्यालय, शेठ एनकेटीटी महाविद्यालय, बी. एन. बांदोडकर या महाविद्यालयांनी महोत्सवात सहभाग घेतला होता. यंदाही महाविद्यालयांनी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावत ५८ व्या युवा महोत्सवात बाजी मारली आहे.
१) जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
- संगीत
- भारतीय शास्त्रीय गायन – द्वितीय क्रमांक
- शास्त्रीय वाद्यवृंद [स्वरवाद्य] एकल वादन – प्रथम क्रमांक
- भारतीय गटगायन – द्वितीय क्रमांक
- पाश्चात्त्य गटगायन – प्रथम क्रमांक
- पाश्चात्त्य गायन एकल – प्रथम क्रमांक
- नाट्यसंगीत गायन एकल – तृतीय क्रमांक
- साहित्यिक
- कथा सांगणे गट अ (मराठी) – द्वितीय क्रमांक
- कथा सांगणे गट ब (हिंदी किंवा इंग्रजी) – द्वितीय क्रमांक
- ललितकला
- कोलाज – प्रथम क्रमांक
- रांगोळी – उत्तेजनार्थ
- स्पॉट फोटोग्राफी – द्वितीय क्रमांक
- नाट्यकला
- एकांकिका गट अ (मराठी) – द्वितीय क्रमांक
२) सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय , ठाणे
- संगीत
- शास्त्रीय वाद्यवृंद [तालवाद्य] एकल वादन – तृतीय क्रमांक
- लोकवाद्यवृंद – द्वितीय क्रमांक
- कव्वाली – उत्तेजनार्थ
- ललितकला
- रांगोळी – उत्तेजनार्थ
- स्पॉट फोटोग्राफी – द्वितीय क्रमांक
- नाट्यकला
- मोनो अभिनय – उत्तेजनार्थ
३) एनकेटीटी महाविद्यालय, ठाणे
- साहित्यिक
- वक्तृत्व गट ब (हिंदी किंवा इंग्रजी) – उत्तेजनार्थ
- नाट्यकला
- एकांकिका गट अ (मराठी) – तृतीय क्रमांक
४) बी. एन. बांदोडकर महाविद्यालय, ठाणे
- ललितकला
मेहंदी डिझाईनिंग – उत्तेजनार्थ